Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्युडो स्पर्धेतील यशाबद्दल धनराज वाघमार याचा सत्कार

 ज्युडो स्पर्धेतील यशाबद्दल धनराज वाघमार याचा सत्कार 




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी येथील बी. ए.भाग -1 मधील खेळाडू धनराज रामभाऊ वाघमारे याने पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठचे वतीने घेण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन ज्युडो स्पर्धेत खुल्या गटात चमकदार कामगिरी करून यश संपादन केले बद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रमसिंह बबनरावजी शिंदे यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांचे उपस्थितीत करण्यात आला.
  या स्पर्धा 12 सप्टेंबर 2025 रोजी शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर या ठिकाणी संपन्न झाल्या.यामध्ये 100 किलो खुल्या गटात(Above 100 kg) द्वितीय क्रमांक मिळवला.धनराज वाघमारे याने याअगोदर ही गोळाफेक स्पर्धेत राज्यपातळीवर सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.या यशाबद्दल  विद्यालयात डॉ.वलगे, क्रीडा शिक्षक डॉ. रवींद्र कुनाळे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या यशाबद्दल धनराज वाघमारे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. त्यास क्रीडा शिक्षक रवींद्र कुनाळे यांनी मार्गदर्शन केले.




Reactions

Post a Comment

0 Comments