Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्करोग जनजागृतीसाठी निदान वॅनचा पंढरपूर तालुक्यात उपक्रम – ६०० हून अधिक लाभार्थ्यांची

 कर्करोग जनजागृतीसाठी निदान वॅनचा पंढरपूर तालुक्यात उपक्रम – ६०० हून अधिक लाभार्थ्यांची





पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्करोग जनजागृती
मोहिमेअंतर्गत कॅन्सर निदान वॅनचा पंढरपूर तालुक्यात आगमन होत असून, या उपक्रमामुळे ग्रामीण
भागातील नागरिकांना त्वरित तपासणी व उपचाराची सुविधा मिळत आहे. दिनांक ११ रोजी भाळवणी, १२ रोजी उपरी, १३ रोजी भंडीशेगाव आणि आज १४ रोजी वाखरी येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
वाखरी येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी डॉ. एकनाथ बोधले (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. भिसे, डॉ. स्वाती बोधले, डॉ. महेश माने
(स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ), डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. खुपसुंगीकर मॅडम (दंत शल्य चिकित्सक), ग्रामपंचायत
पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र गा दे गाव व भाळवणीचे अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष लाभार्थी उपस्थित होते.

* तपासणी व निदान

या चार गावांमध्ये आतापर्यंत ६०० हून अधिक लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, मुख
कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग व स्तन कर्करोगाच्या संशयित रुग्णांची पुढील तपासणी उपजिल्हा व
सामान्य रुग्णालयांमार्फत केली जाणार आहे. अंतिम निदानानंतर उपचाराचे नियोजन सार्वजनिक आरोग्य
विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.
* महिलांच्या आरोग्यावर विशेष भर
स्वस्थ नारी – सशक्त परिवार उपक्रमांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष व्यवस्था
करण्यात आली आहे. निदान वॅनमध्ये रक्तदाब, मधुमेह, रक्त व लघवी तपासणीसह आवश्यक सर्व वैद्यकीय
तपासण्या उपलब्ध आहेत.

* मान्यवरांचे विचार
डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले की, “कॅन्सर निदान वॅनमुळे ग्रामीण भागात लवकर निदान व उपचार
शक्य होत असून, ही सुविधा गावागावात पोहोचत आहे. लवकर निदान झाल्यास उपचाराद्वारे आजार
पूर्णपणे बरा होऊ शकतो.”

* आमदार समाधान आवताडे म्हणाले, “सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांचा आरोग्यविषयक दृष्टिकोन प्रगल्भ असून, या माध्यमातून
नागरिकांना जनजागृती, तपासणी व उपचाराचा थेट लाभ मिळत आहे.”

पुढील शिबिरांचे वेळापत्रक
- १५ सप्टेंबर – इसबावी
- १६ सप्टेंबर – पंचायत समिती, पंढरपूर
- १७ सप्टेंबर – आजनसोंड
- १८ सप्टेंबर – सुस्टे
- १९ सप्टेंबर – फुलचिंचोली

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. भगवान पवार (उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ),
डॉ. संतोष नवले (जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर), डॉ. वर्षा डोईफोडे (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ.
नंदकिशोर घाडगे, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. मोहन शेगर यांचे मार्गदर्शन लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments