सुमित्रा पतसंस्थेचे योगदान विसरून चालणार नाही - मोहिते पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- ४६ हजार कुटुंबांचे संसार उभे करण्यास १ हजार ६५कोटींचे कर्ज सुलभरीत्या देणाऱ्या सुमित्रा पतसंस्थेचे योगदान विसरून चालणार नाही . काही अफवा व कर्जमाफी यामुळे कर्जे परत न आल्याने पतसंस्था अडचणीत आली . पुढील दोन वर्षात पतसंस्थांच्या उर्वरित ठेवीदारांच्या सर्व ठेवी व्याजासहित परत करण्यास सुरुवात करेल असे मत या पतसंस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते -पाटील यांनी व्यक्त केले .पतसंस्थेच्या ३७ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते .
पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव अंधारे यांनी सभेपुढील सर्व ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले .पुढे बोलताना जयसिंह म्हणाले की ,पतसंस्थेने १ हजार ६५ कोटींचे कर्ज वाटून अनेकांचे संसार उभे केले .त्यापैकी ९०० कोटी वसूल झाले . पतसंस्थेकडे २०० कोटींच्या ठेवी होत्या त्या काळात काही अफवांमुळे पतसंस्था अडचणीत आल्या अन्यथा अकलूजमध्ये इतर बँकांचे पेव फुटले नसते असेही जयसिंह मोहिते पाटील म्हणाले .कर्ज थकवणाऱ्या ७०० कर्जजारांवर कायदेशीर कारवाई केली आहे .येत्या सहा महिन्यात १० कोटी पर्यंतची वसुली होईल .सध्या पतसंस्थेकडे ५६ कोटी मुद्दल व १४ कोटी व्याज असे ७३ कोटी ठेवीदारांचे देणे आहे . पतसंस्थेला कर्जदारांकडून १७३ कोटी येणे आहे पुढील दोन वर्षात ७० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार आहे . त्यावेळी सर्वांच्या ठेवी व्याजासह आम्ही परत करणार आहोत .पतसंस्थेने आजवर अनेक सामाजिक कार्यक्रम राबवून समाजसेवेचे व्रतही कायम ठेवले आहे .गत नव वर्षात ९९ कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी परत ठेवल्या असल्याने पतसंस्थेवरील विश्वास कायम असल्याचे जयसिंह यांनी सांगितले .
0 Comments