मंगळवेढ्यात भिमेच्या पुराच्या पाण्याने पिकांचे नुकसान'
हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात, शेतकरी चिंतेत
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- उजनी व वीर धरणातून अतिरिक्त पाणी भिमा नदीच्या पात्रात 1 लाख 87 हजार 850 क्युसेक सोडल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावाला पुराचा तडाका बसला. यामध्ये नदीकाठची हातातोंडाशी आलेली पिके सध्या पाण्यात गेल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखीनच भर पडली.
गेल्या दिवसापासून पुणे परिसर व नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्याने या परिसरातील वीर व उजनी धरणातील पाणी नीरा व भिमा नदीत आल्याने भिमा नदीत 1 लाख 87 हजार 850 क्युसेक्सने गुरुवारी वाहत आहे. यंदा दोन वेळा भिमा नदी पुर सदृश्य परिस्थितीत वाहिली. मे च्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यामुळे भिमा नदी धोक्याच्या पातळीत वाहत होती. मध्यंतरी आलेल्या पाण्यामुळे वडापूर -सिध्दापूर को.प. बंधार्याचा भरावा वाहून गेला होता. नागरिकांच्या मागणीनंतर हा भरावा पुन्हा टाकण्यात आला.
मात्र सध्या आलेल्या पाण्यामुळे पुन्हा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील भिमा नदी काठी उचेठाण,बठाण, माचणूर,अरळी,वडापूर,सिध्दापूर, आदी को.प. बंधारे पाण्याखाली गेले असून तिर्थक्षेत्र सिध्देश्वर मंदिरातील श्री जटाशंकर मंदिरही पाण्याखाली गेले. दरम्यान सध्या पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात जावू नये असे आवाहन भिमा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीशैल हालकुडे यांनी आवाहन केले. दरम्यान पुराने वेढा दिल्यामुळे तालुक्यातील ऊस, कांदा, केळी, डवळ,डाळिंब,द्राक्ष,मका,भाजीपा ला या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.तर तहसीलदार मदन जाधव यांनी नदीकाठचे मंडल अधिकारी व तलाठी यांना पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या.
सतत पडणाऱ्या पावसामुळे आधीच फळबागाचे नुकसान झाले आहे, त्यात ऊजनी व विर धरणातुन सोडलेल्या पाण्यामुळे सिद्धापुर येथील ऊस, उडीद, केळी इत्यादी पिकासह मका, कडवळ सह जणावरांचे चारा पण पाण्याखाली गेल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, तरी शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावे.
0 Comments