श्रद्धा संकुलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा
मोहोळ शहर : (कटूसत्य वृत्त):- येथील श्रद्धा संकुल मोहोळ येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल मोरे, राहुल डोके, अध्यक्ष सुनील झाडे, संचालक मोहित झाडे, प्रथमेश झाडे, शाळा व्यवस्थापक मिलन ढेपे, धरती पाटील, मुख्याध्यापिका सरस्वती सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपले स्वतंत्र
दिनाविषयीचे मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून ए मेरे वतन के लोगो, छोडो कल की बाते, ऑपरेशन सिंदूर यावर आधारित नृत्य सादरीकरण केले. शिक्षक मनोगत निरंजना घातक यांनी, तर कीर्ती गुरव यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
0 Comments