Hot Posts

6/recent/ticker-posts

राहुल गांधींना खूश करण्यासाठी प्रणिती शिंदे यांचे देशद्रोहीपणाचे वक्तव्य - चेतनसिंह केदार सावंत

 राहुल गांधींना खूश करण्यासाठी प्रणिती शिंदे यांचे देशद्रोहीपणाचे वक्तव्य - चेतनसिंह केदार सावंत





सांगोला (कटूसत्य वृत्त):- पहेलगाम हल्ल्यात अनेक भगिनींच्या कपाळावरील सिदूर पुसण्यात आला. त्याला प्रत्युतर महणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेतली. या मोहिमेची माहिती सांगण्यासाठी सोफिया कुरेशी यांची लष्कराच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. या भारतीय लष्काराने केलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेचे संपूर्ण देशाने समर्थन केले. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरचे सर्वपक्षीयांकडून स्वागत करण्यात आले होते. केवळ राहुल गांधी यांना खूश करण्यासाठी, त्यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी देशद्रोहीपणाचे वक्तव्य केले असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली.
     पहेलगाम प्रकरणावरून मंगळवारी संसदेत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून देशभक्ती वाटते. पण, सरकारने माध्यमांमध्ये केलेला तो एक तमाशा होता, असे वक्तव्य केले होते. दिल्लीच्या संसदेत पहेलगाम प्रकरणी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ, खा. प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, प्रणिती शिंदे यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जनतेची मान शरमेने खाली गेली आहे. काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये हिम्मत नसल्यामुळे ते अशी विधाने नवख्या सदस्यांकडून वदवून घेतात. भारतीय सैन्याच्या शौर्याला भर संसदेत तमाशा म्हणणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य देशद्रोहीपणाचे आहे. देशातील सर्व जनता भारतीय लष्कराच्या बळावर सुरक्षित आहे, त्यांच्याबाबत अशी उपेक्षात्मक भाषा करणाऱ्या प्रणिती शिंदे यांनी देशाच्या अस्मितेवरच घाव घातला असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments