Hot Posts

6/recent/ticker-posts

अन्नछञ मंडळ वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव

 अन्नछञ मंडळ वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव



देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह मराठी-हिंदी गीतांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सांस्कृतिक कार्यक्रमाचा अखेरचा दिवस बुधवार सायंकाळी श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सुर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत ह्या कार्यक्रमाने १० वे पुष्प संपन्न झाले. देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह मराठी-हिंदी गीतांच्या या कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्रीमंत छत्रपती वृषालीराजे शिवाजीराजे भोसले, सातारा, छत्रपती संभाजी नगरचे रविराज साळुंके, संपादक राकेश टोळ्ळे, अण्णा थोरात पुणे, अक्षय चौगुले कोल्हापूर, मनोज शिंदे लातूर, आरतीताई लिंगायत मुंबई, जयंत सुभेदार अक्कलकोट, दीपक खैराटकर ठाणे, डॉ. संतोष मेहता, राजेंद्र मायनाळ सोलापूर, सतीश भूमकर पुणे, विश्वास कुलकर्णी सोलापूर, बाबुशा महिंद्रकर अक्कलकोट, शुभम नागरे उद्योगपती नाशिक, अक्कलकोट एस.टी.डेपो आगार व्यवस्थापक रणजित साळवे, शिरीष पंडित, बाबासाहेब पाटील, संजय गांधी निराधार समिती सदस्य- सिद्धाराम माळी, छत्रपती प्रतिष्ठान,मैंदर्गी अध्यक्ष- गणेश गोब्बुर, प्रहार संघटना शहर अध्यक्ष- अमर सिरसाट, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. न्यासाच्या वतीने श्रीमंत छत्रपती वृषालीराजे शिवाजीराजे भोसले, सातारा, यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट :
गुणीजन गौरव  :
मिडिया नियोजन –प्रशांत भगरे, सोमशेखर जमशेट्टी, स्टेज नियोजन – राजेंद्रकुमार पवार, रमेश हेगडे, गुणवंत विद्यार्थी सत्कार व उत्कृष्ठ नियोजन – शांतप्पा कलबुर्गी सर, संगणक ऑपरेटर- प्रसाद हुल्ले, संगणक ऑपरेटर- शरद भोसले,   दत्त प्रिंटिंग प्रेस- स्वामीनाथ बाबर, सूत्रसंचालन व निवेदिका- श्वेता हुल्ले, मुख्य सुरक्षा रक्षक – महादेव अनगले, सह.मुख्य सुरक्षा रक्षक – अनिल गवळी, मंडप कॉनट्रक्टर – राऊत, स्क्रिन ऑपरेटर – गोविंद केकेडे, साउंड ऑपरेटर – संदीप सरवदे, लाईट ऑपरेटर – जोगदंड, फोटोग्राफी – ज्ञानेश्वर भोसले, मंडप नियोजन – कल्लप्पा छकडे, केरळ वाद्यवृंद प्रमुख- गणेश देवडिंग (मोर्डेश्वर) यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चौकट :
गुणवंत विद्यार्थी गौरव  :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, अनिता गडदे, रोहिणी देशपांडे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, संदीप फुगे-पाटील, लक्ष्मण पाटील, अनिल पाटील ठाणे, डॉ. प्रसाद प्रधान ठाणे, रामचंद्रराव घाटगे, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, अश्पाक काझी, सर्फराज शेख, प्रवीण देशमुख, स्वामिनाथ गुरव, ओंकारेश्वर उटगे, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, राजु नवले, शितल जाधव, अनिकेत सोनटक्के, बालाजी पाटील, निखील पाटील, रोहन शिर्के, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, उमेश येळसंगी, आकाश शिंदे, दीपक जरीपटके, नरसिंग क्षीरसागर, संजय बडवे, संतोष तोळणूरे, बसवराज म्हेत्रे, श्रीपाद चव्हाण, रजाक सय्यद, यश विभूते, प्रा. सायबण्णा जाधव, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, तानाजी पाटील, आकाश सूर्यवंशी, शुभम सावंत, लक्ष्मण विभूते, प्रीतेश किलजे, समर्थ घाडगे, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रा. शरणप्पा आचलेर, प्रा. मनोज जगताप, प्रशांत साठे, गोविंदराव शिंदे, प्रा.भीमराव साठे, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, रमेश हळसंगी, संतोष माने, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.  उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.

चौकट :
दि. १० जुलै रोजी गुरूपौर्णिमे निमित्त गुरुवार सकाळी ७ ते ९ पर्यंत महाप्रसादगृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र  सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वा. खालील मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानवैद्य दाखविण्यात येणार आहे.

यांच्या हस्ते-खासदार- श्रीरंग बारणे, मावळ पुणे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, शिवाजीराव फुंदे, स्वामीभक्त, मुंबई, ह.भ.प. गंजीधर महाराज, नागेश्वर संस्थान, पळसखेडा-मुर्तड, ता. भोकरदन, जि. जालना, महेश गावस्कर, सी .ए. पुणे, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, प्रभाकर शिंदे सन्मा. देणगीदार, छत्रपती संभाजीनगर, (देणगीदार व पालखी संयोजक शिरवळ, पुणे), यांच्या हस्ते आणि अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.


चौकट :
दि. १० जुलै रोजी गुरुवार सकाळी ११  ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, सायं ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात आणि अतुल बेहरे पुणे यांच्या ‘नांदब्रम्ह’ या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. मा.स्थायी समिती चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे, कासुर्डी (खे), ता.भोर, जि. पुणेचे देणगीदारसंतोष कोंडे यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments