सहकार महर्षि कारखान्यामध्ये हंगाम २०२५-२६ करीता ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२५-२६ करीता बैलगाडी, बजाट,ट्रक,ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्र यांचे तोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
सहकार महर्षि कारखान्याकडे गत हंगाम २०२४-२०२५ मध्ये ऊस तोडणी वाहतूकीचे काम केलेल्या वाहन मालक यांची ऊस तोडणी वाहतूकीची संपुर्ण बिले अदा करणेत आली असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी दिली.गळीत हंगाम २०२५-२६ करीता कारखान्याने ९ लाख मे.टन ऊस गाळप करणेचे उदिष्ट ठेवले असुन बैलगाडी,बजाट,ट्रक,ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार यांनी जास्तीत जास्त तोडणी वाहतूकीचे करार करून गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख,संचालक सतीश शेंडगे,नानासाहेब मुंडफणे, विराज निंबाळकर,रावसाहेब पराडे,अमरदिप काळकुटे,सुभाष कटके,कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, धनंजय सावंत व विजयराज वाहतूक संघाचे चेअरमन केशव ताटे,राजेंद्र शिंदे,रमेश मिसाळ, कल्याणराव दुपडे,रामदास बेलदर,आगतराव शिंदे व सर्वसेवा संघाचे वसंत जाधव, विजय माने-देशमुख तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले तसेच बैलगाडी,बजाट,ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार आणि खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments