महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अकलूज येथे आयोजन करावे : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
अकलूज : (कटुसत्य वृत्त):- महाराष्ट्र केसरी २०२६ पुरुष आणि महिलांच्या या दोन्ही स्पर्धांचे अकलूज येथे आयोजन करावे, अशा मागणीचे पत्र खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले.
पत्रात म्हटले आहे की, सन १९७६ मध्ये सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या घटनेस २०२६ साली पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. हा सुवर्ण महोत्सवी क्षण अकलूजकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्ताने महाराष्ट्र केसरी पुरुष व महिला या दोन्ही स्पर्धा अकलूज येथे घेण्याचा प्रस्ताव आम्ही या निमित्ताने आपणास देत आहोत.
अकलूज हे कुस्ती परंपरेतील एक महत्त्वाचे केंद्र असून येथे भव्य मैदान, उत्कृष्ट सुविधा व कुस्ती शौकिनांच मोठा प्रतिसाद आहे. याचा विचार करून आपण अकलूज येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याची मान्यता द्यावी, अशा प्रकारची विनंती पत्रातून खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
0 Comments