मनोहर भिडे यांना चावलेल्या कुत्र्याचे स्मारक सांगलीच्या चौकात बांधण्यात यावं- उत्तरेश्वर कांबळे
करमाळा (कटूसत्य वृत्त):- मनोहर भिडे हे ऐतिहासिक पुरुष आहेत, त्यांच्या नावे अनेक विश्वविक्रम आहेत. त्यांनी रायगड येथे सरकार परवानगी देवो, अथवा न देवो दीप प्रज्वलन करणाऱ्या तरूणांना ११००० तलवारी वाटप करून टोळ्या बनवणार असल्याची घोषणा केली. तसेच महात्मा गांधी, महात्मा फुले, तथागत गौतम बुद्ध आणि इतर महापुरुषांची बदनामी करण्याचा त्यांना शिवीगाळ करण्याचा विश्वविक्रम देखील त्यांचा नावे आहे. आणि त्यांच्यावर ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असुन, १२ तडीपारीचे आदेश पडून आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना अटक न करण्याचे धाडस दाखवून, ते किती ऐतिहासिक महापुरुष आहेत हे सिद्ध केले आहे. नुकतीच भिडे यांची वाघ्या कुत्र्याबद्दलची भूमिका, ते किती मोठे श्वान प्रेमी आहेत हे दाखवून देणारी आहे. आणि म्हणून अशा ऐतिहासिक पुरुषासोबत जर एखादी घटना घडली, तर येणाऱ्या पिढीला त्यांच्या इतिहासाची माहिती असणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मनोहर भिडे गुरुजी यांना जिथे कुत्रा चावला, त्या सांगली येथील माळी गल्लीत त्या कुत्र्याचे स्मारक बांधण्यात यावे. अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे.
पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि अशा अनेक प्रकरणात तातडीने आरोपींची धरपकड झाली नाही. परंतु मनोहर भिडेला फक्त कुत्रा चावला तर संपूर्ण महाराष्ट्राची यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे मनोहर भिडे या युगाचे महापुरुष आहेत. आणि अशा महापुरुषाला चावलेल्या कुत्र्याचे स्मारक बांधणे अत्यंत गरजेचे आहे. अशी खोचक टिका उत्तरेश्वर कांबळे यांनी केली.
0 Comments