Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यातील स्टेट बॅकेत सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा,ग्राहकाचे सापडलेले पैश्याचे पाकीट केले परत

 माढ्यातील स्टेट बॅकेत सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा,ग्राहकाचे सापडलेले पैश्याचे पाकीट केले परत 






माढा (कटूसत्य वृत्त):-
सध्याच्या युगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे.
अश्थातच माढ्यातील स्टेट बॅकेत सुरक्षा रक्षकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे.

ग्राहकाचे सापडलेले पैश्याचे पाकीट सुरक्षा रक्षक भारत फरतडे यांनी परत केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,माढ्यातील स्टेट बॅकेच्या शाखेत बॅकिग व्यवहार करण्यासाठी श्री आतकरे हे ग्राहक आले होते.

सुरक्षा रक्षक म्हणुन कर्तव्यावर असलेल्या फडतरे यांना बॅकेच्या प्रवेश द्वारासमोर पैश्याचे पाकीट पडल्याचे आढळुन आले.पैश्याचे पाकीट सापडल्याची घटना शाखाधिकारी प्रसाद कदम यांना सांगितली.कदम यांनी बॅक ग्राहकांची माहिती काढली असता आतकर यांचे पाकिट पडल्याचे समजले.त्यानंतर आतकर यांच्याशी संपर्क साधुन २० हजारांची रोकड असलेले पाकिट व अन्य महत्वाची कागदपत्रे ओळख पटवून देण्यात आली.प्रामाणिकपणा दाखवल्या बद्दल सुरक्षा रक्षक फडतरे यांचा शाखाधिकारी प्रसाद कदम यांच्याकडून  सत्कार करण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments