Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शीच्या 'शिवसृष्टी'तून ऐतिहासिक प्रसंग वगळले

 बार्शीच्या 'शिवसृष्टी'तून ऐतिहासिक प्रसंग वगळले




बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी नगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या 'शिवसृष्टी' प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दर्शविण्यात आले आहेत. मात्र, शिवभक्तांच्या मते, या 'शिवसृष्टी'त लाल महालातील शाहिस्तेखानावर छापा व बोटे छाटल्याचा प्रसंग व प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान वधाच्या पराक्रमाचे शिल्प समाविष्ट करावे, या मागणीसाठी शिवराज्य सेना संघटनेच्या वतीने नगरपालिकेच्या इमारतीवर चढून जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवप्रेमींनी घोषणाबाजी करत बार्शी नगरपालिकेचा निषेध नोंदवला.हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे समाविष्ट करणे, हा त्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष क्षण वगळल्याची टीका करण्यासारखा आहे, अशी टीका शिवभक्तांनी केली. शिवराज्य सेनेचे हर्षवर्धन पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना याबाबत प्रश्न विचारला. रशाळांमध्ये लहानपणापासून शिवरायांचा पराक्रम शिकवला जातो, मग बार्शीतील 'शिवसृष्टी'तच हा पराक्रम दाखवण्यात टाळाटाळ का ?₹ असा सवाल त्यांनी उपस्थित करत यावेळी मुख्याधिकारी बाळासाहेब शिवभक्तांच्या मते, शाहिस्तेखानावरील छापा
हा स्वराज्याच्या इतिहासातील पहिला 'सर्जिकल स्ट्राईक' म्हणून ओळखला जातो. तसेच, प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला अफजलखान वध हा स्वराज्याच्या स्थापनेसाठी निर्णायक ठरला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले हे दोन्ही प्रसंग 'शिवसृष्टी'त न शहराचे लक्ष नगरपालिकेच्या निर्णयाकडे बार्शीतील 'शिवसृष्टी'त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयक भित्ती शिल्पातून अनेक प्रसंग दाखाविण्यात आले आहेत. या आंदोलनानंतर शाहीस्तेखानावर छापा आणि अफजलखान वधाची शिल्पे उभारली जाणार की नाही, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने या ऐतिहासिक मागणीकडे दुर्लक्ष केल्यास, शिवभक्तांनी आणखी तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा यावेळी दिला.चव्हाण यांना शालेय इतिहासाचे पुस्तक भेट देण्यात आले. शिवराज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेला निवेदन देऊन शाहिस्तेखानावर छापा आणि अफजलखान वधाची भव्य शिल्पे उभारण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवभक्तांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments