Hot Posts

6/recent/ticker-posts

फोफेरी कनिष्ठ महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन शिबिर संपन्न!

फोफेरी कनिष्ठ महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन शिबिर संपन्न! 



अलिबाग (कटूसत्य वृत्त):- रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे रस्ता सुरक्षा अभियान समारोप सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 31 जानेवारी रोजी 135 विद्यार्थी व 14 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासमोर संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य. अनंत गायकर,  उद्घाटक  अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे,  प्रमुख वक्ते डॉ. जयपाल पाटील हे होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर प्राध्यापक अविनाश गीते, पालक प्रतिनिधी , परेश पाटील हे उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्राचार्य अनंत गायकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर डॉ. जयपाल पाटील यांनी संविधान वाचन सर्वांकडून करून घेतले. पोलीस निरीक्षक श्री किशोर साळे यांनी उद्घाटन पर भाषणात  सांगितले की या देशाचे तुम्ही भावी शिलेदार आहात आणि वयाच्या 18 व्या वर्षानंतर कायम तुम्हाला मोटर सायकल, चार चाकी चालवायचे आहे आपल्यापैकी दोन मुले अतिशय हुशार आहेत ते आपल्या आई-वडिलांची सोळाव्या वर्षीच दुचाकी चालवायला शिकलेली आहे असल्याने कायद्याने हा गुन्हा आहेच, त्यांच्याकडून रस्त्यावर अपघात झाला तर आई-वडिलांना शिक्षा आणि दंड होणार रुग्णालयाचा खर्च आणि कायम अपंगत्व  सोबत  वाहनांचे विमा खर्च मिळत नाही यासाठी मुला-मुलींनी परवाना नसताना वाहने चालू नये तर मुलींनी आपल्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर कायम करा व आपल्या मैत्रिणींना सांगा असे सांगितले.यावेळी डॉ. जयपाल पाटील यांनी आपल्या गावामधील बाळंतपणासाठी आलेल्या ताईला रुग्णालयात पाठवायचे असेल तर 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष देता 102 वर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याला फोन लावतात ठिकाण सांगतात रायगड जिल्हा परिषदेच्या पेनांबे आरोग्य केंद्रातून डॉक्टर भक्ती बैकर यांनी संपर्क साधून वाहनचालक स्वप्निल पाटील यांनी वीस मिनिटात रुग्णवाहिका आणली त्याचे स्वागत प्राचार्य अनंत गायकर यांनी केले त्यानंतर मुलींच्या व महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांक वर संपर्क साधताच कोयनाड  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी बीट अंमलदार हवालदार हरीश मुंगसे यांना पाठविले त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईल टॅबची मुला मुलींना माहिती दिली तर अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा यासाठी रायगड जिल्हा प्रमुख  विजय काटकर यांना संपर्क करताच त्यांनी पेण येथील डॉक्टर अजित बर्गे व पायलेट प्रशांत पाटील हे 25 मिनिटात शाळेत पोहोचले डॉक्टर बर्गे यांनी 108 चे कार्यपद्धतीचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर  आपल्या घरातील गॅस सिलेंडर त्याची नळी इलेक्ट्रिकल वस्तू जंगलातील व घरातील आगीच्या वेळी घेण्याची काळजी कोणत्याही आपत्तीच्या वेळी लागणारे  मोबाईल क्रमांक विद्यार्थ्यांना दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अविनाश पाटील  यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शिवाजी गीते यांनी मानले विक्रम यशस्वी करण्यास  विकास रणपिसे, मंगल नाईक, सुभाष पाटील यांनी खूप मेहनत घेतली.

Reactions

Post a Comment

0 Comments