Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 नातेपुते येथील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी



नातेपुते(कटूसत्य वृत्त):-
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात ३ जानेवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले  यांची जयंती प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी सानिका माने ( १२ सायन्स) व ऋतुजा लोंढे ( १२ आर्ट्स) यांनी मनोगत व्यक्त करताना केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही मुली व महिला शिक्षण घेऊन सक्षम होत असल्याचे मनोगत व्यक्त केले. त्याबरोबरच प्राध्यापक राजेंद्र साठे यांनी विद्येची देवता सावित्रीबाई फुले आहेत त्यांनी स्त्री शिक्षणासाठी चळवळ उभी केली असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा. पुष्पा सस्ते यांनी सन १८ व्या शतकात सावित्रीबाईंना ज्या यातना सहन कराव्या लागल्या तो त्रास सध्याच्या मुली व महिलांना नाही पण वैचारिक क्रांती करून मुलींनी स्वतः सक्षम व निर्भीड बनणे आवश्यक आहे असे मत प्रा. पुष्पा सस्ते व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली या शिक्षणाचा उपयोग आपल्या करिअरसाठी करावा गैरवर्तन टाळून चारित्र्यसंपन्न बनावे .आपल्या आई-वडिलांचे महाविद्यालयाचे व संस्थेचे नावलौकिक करावे असा शुभ संदेश दिला.या कार्यक्रमासाठी प्रा मोगल हसन  प्रा.नारायण माने, प्रा. अजित भोपळे, प्रा.दयानंद साठे ,प्रा. सतीश चव्हाण, प्रा.सचिन माळी ,प्रा.शिवाजी बर्गे ,प्रा. बापूराव वाघमोडे, प्रा. नितीन देशपांडे प्रा.दीपक वाघमोडे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे विद्यार्थिनी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रब्बाना शेख व मोगल यांनी केले. प्रा. सचिन पवार यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments