आचारसंहितेत रोकड, मद्य, सोनं-चांदीचा सुकाळ; तब्बल ४९३ कोटींचा मुद्देमाल जप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 26, 2024

आचारसंहितेत रोकड, मद्य, सोनं-चांदीचा सुकाळ; तब्बल ४९३ कोटींचा मुद्देमाल जप्त

 आचारसंहितेत रोकड, मद्य, सोनं-चांदीचा सुकाळ; तब्बल ४९३ कोटींचा मुद्देमाल जप्त




मुंबई (कटूसत्य वृत्त):- आचारसंहितेच्या कालावधीत करण्यात आलेल्या जप्तीच्या कारवाईत आत्तापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी जवळपास साडेतीन पटीने अधिक मुद्देमाल जप्त झाल्याचे दिसून आले आहे. राज्यभरातील या कारवाईत मुंबई उपनगरांत १३८ कोटी, मुंबई शहरात ४४ कोटी आणि नागपुरात ३७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत बेहिशेबी रोकड, मद्य, अमली पदार्थ आणि सोने चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या दागिन्यांचा समावेश आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू असल्याने विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून बेहिशेबी मुद्देमाल जप्तीची कारवाई सुरू आहे. त्यात बेहिशेबी रोकड, दारू, ड्रग्स आणि मौल्यवान धातूंच्या वस्तूंचा समावेश आहे. मुंबई उपनगरांतून १३८ कोटी १९ लाख, मुंबई शहर येथून ४४ कोटी ९५ लाख, नागपूर येथून ३७ कोटी ५३ लाख, पुणे येथून ३२ कोटी २९ लाख, अहमदनगर येथून २९ कोटी ९८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काळात दारूजप्तीची ही कारवाई करण्यात आली असून पुण्यात ५ कोटी १७ लाख रुपये किंमतीची दारू ताब्यात घेण्यात आली आहे. त्यापाठोपाठ नांदेड येथून ३ कोटी २२ लाख, अहमदनगर येथून ३ कोटी ४ लाख, वर्धा येथून २ कोटी ९६ लाख, नाशिक येथून २ कोटी ५५ लाख, धुळे येथून २ कोटी ४९ लाख, नागपूर येथून २ कोटी ३० लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आल्याची माहिती यावेळी पुढे आली आहे.

सर्वाधिक रोख रक्कम जप्त केलेले जिल्हे
मुंबई शहर - ३१ कोटी ६३ लाख
नागपूर - १८ कोटी १८ लाख
पालघर - १३ कोटी ९६ लाख
ठाणे - १२ कोटी ४१ लाख
पुणे - ११ कोटी २९ लाख

सर्वाधिक ड्रग्जजप्ती
मुंबई उपनगर - ३९ कोटी ९० लाख रुपये
बुलढाणा - ४ कोटी ५४ लाख रुपये
मुंबई शहर - ४ कोटी ६ लाख रुपये
ठाणे - १ कोटी ६४ लाख रुपये

सर्वाधिक मौल्यवान जप्ती
मुंबई उपनगर - ८४ कोटी १६ लाख
अहमदनगर - २३ कोटी ६१ लाख
नागपूर - १३ कोटी ८२ लाख
औरंगाबाद - ९ कोटी २४ लाख
पुणे - ८ कोटी ६३ लाख

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages