Hot Posts

6/recent/ticker-posts

ईव्हीएम मशीनला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा- अक्षय भांड

  ईव्हीएम मशीनला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा- अक्षय भांड




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- विधनसभा निवडणुकीत  महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला जात आहे. या मुद्यावरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांवर विरोधकांकडून टीका होत आहे. माळशिरस तालुक्यातील लोकांनी विकासाला मतदान केले आहे. माळशिरस तालुक्यातील जनता ही दोन्ही गटांना कंटाळली आहे म्हणून त्यांनी तिसरा पर्याय निवडला आणि महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहीली त्यामुळे विरोधकांनी ईव्हीएम मशीनला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावे असे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी विरोधकाला टोला लावला.
  महायुतीचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी ही निवडणूक प्रामाणिक पणे लढलो पण थोड्या मतांनी आमचा पराभव झाला तो पराभव आम्ही नम्रपणे मान्य केला आज राज्यामध्ये आमचे सरकार आहे माळशिरस तालुक्यासाठी जे काही करता येईल तेवढे करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण काही लोकांना विजय होऊन ही तो पचवता येत नाही याची मोठी खंत आहे. माळशिरस तालुक्याच्या विकासाचा विचार न करता  काही लोक  फक्त ईव्हीएम
 करत सुटले आहेत कदाचित त्यांची पाच वर्षे ईव्हीएम मशीनला दोष देण्यात जातील मात्र राज्याचे नेते अजित पवार यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यासाठी मोठा निधी  आणार असल्याचे अक्षय भांड यांनी सांगितले.


Reactions

Post a Comment

0 Comments