बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन निघालेला टेम्पो मोहोळ पोलीसांनी पकडला
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- कत्तलीसाठी दीड लाख रुपयाची बेकायदेशीर जनावरे घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलिसांनी व गोरक्षक पथकाने पकडला व जनावरांची गोशाळेत रवानगी केली. या प्रकरणी टेम्पो चालका विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
हा प्रकार मोहोळ ते वैराग मार्गावरील नरखेड येथील चार रस्ता चौकात गुरूवारी दुपारी 3 वाजता घडला. दरम्यान टेम्पो चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो क्रमांक एमएच 04 डी के 3239 हा मोहोळ होऊन वैरागच्या दिशेने निघाला होता.
सदरचा टेम्पो नरखेड येथील चार रस्ता चौकात आला असता संशय आल्याने गोरक्षक पथक व नरखेड पोलिसांनी हा टेम्पो आडविला. त्यात पाहिले असता, लहान मोठी एकूण 18 जनावरे दाटीवाटीने व पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. तसेच त्यांच्या चाऱ्या पाण्याची कुठलीही सोय केली नव्हती.
दरम्यान ही जनावरे अहिंसा गोशाळा सोलापूर येथे दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल धनाजी घोरपडे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून, तपास अंमलदार समाधान पाटील करीत आहेत.
.jpg)
 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
 
 
 
0 Comments