बाबूराव अण्णा चाकोते यांच्या स्मृतींना विविध संस्थांतर्फे उजाळा
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- येथील राजकीय, सामाजिक, कृषी व सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आदर्श लोकनेते सहकाररत्न तथा माजी आ. बाबूराव अण्णा चाकोते यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त शहर व जिल्ह्यातील विविध संस्था व संघटनांतर्फे त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा महापूजनाचा कार्यक्रम माजी आमदार विश्वनाथ चाकोते व सुप्रीता चाकोते या दाम्पत्याच्या हस्ते पार पडला. यावेळी विश्व शंकर चाकोते, भगिनी महानंदा बंदी यांच्यासह चाकोते परिवारातील सदस्य उपस्थित होते.दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कै. बाबूराव अण्णा चाकोते यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही चाकोते प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी, सकाळी तळेहिप्परगे येथील भीमाशंकर इस्टेट येथे असलेल्या चाकोते यांच्या शेतातील बाबूराव अण्णा समाधीस्थळावर यांच्या लोकनेते बाबुराव कोते प्रशासकीय भवन मिती सोलापुर रुद्रपूजा करण्यात आली. तसेच पुष्पमाला बलिदान चौक येथील जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या कार्यालयातही चाकोते यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बाबूराव अण्णा चाकोते यांनी आपल्या लोकप्रतिनिधी असतानाच्या कार्यकाळामध्ये शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासह अनेक विकासाभिमुख कामे केली. त्यामुळे आजही समाजामध्ये त्यांचे विविध घटकांकडून आदराने स्मरण करण्यात येते, असे प्रतिपादन त्यांचे सुपुत्र माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केले. तसेच बाबूराव अण्णा नगराध्यक्ष महापौरपद, दोन वेळा आमदार, डीसीसी बँकेचे अध्यक्ष, बाजार समितीचे सभापतिपद भूषवून यांनी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments