Hot Posts

6/recent/ticker-posts

चांगल्या कामासाठी कौतुकाची थाप—दत्तात्रय सावंत

 चांगल्या कामासाठी कौतुकाची थाप—दत्तात्रय सावंत




गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सोलापुर (कटूसत्य वृत्त):- शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतात.विद्यार्थी घडवण्याबरोबरच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम करतात.चांगले काम करणार्‍या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आवश्यक असते.असे मत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले.

  डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा डाॅ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात  पार पडला.यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,संघटनेचे प्रदेश सचिव सुनिल चव्हाण,नितीन जाधव,गूरुनाथ वांगीकर,सोमेश्वर याबाजी,शाम कदम, सचिन चौधरी अ.गफुर अरब व विनोद आगलावे उपस्थित होते.महात्मा जोतिराव फुले हे दुरदृष्टी असलेले समाजसुधारक होते.शिक्षणांचे महत्व ओळखुन त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची मागणी केली होती.असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केले.

 पुरस्कारप्राप्त शिक्षक — ललिता नागटिळक,कोंडीराम जगदाळे,शिवाजी मते,दिपेशकुमार खुळे,बानकरी इरफान,भर्तरी विधाते,बसप्पा रगटे,नवनाथ वाघमोडे,रमेश राठोड,भाग्यश्री सातपुते,प्रेरणा मठपती,बद्रुन्नीसा दफेदार,सुजाता साखरे,शबाना मुलाणी,आशा नायडु व माधुरी उपाध्ये.जि.प.प्रा.शाळा उमरड,करमाळा उपक्रमशील पुरस्काराने सन्मनित करण्यात आले. स्मृतीचिनह,प्रमाणपत्र व शाल देऊन पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल गायकवाड,किरण गाटे,श्रीराम जाधव,नारायण पवार,निलेश पवार,बरगली लांडगे,धन्यकुमार स्वामी,सिद्भेश्वर पवार,संतोष रजपुत,प्रदीप सातपुते यांनी प्रयत्न केले.सुत्रसंचालन अतुल नारकर यांनी तर दिपक डांगे यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments