Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षक जिवंत शिल्पे घडविण्याचे देशोपयोगी काम करतात - माजी आ. सावंत

 शिक्षक जिवंत शिल्पे घडविण्याचे देशोपयोगी काम करतात - माजी आ. सावंत 




राज्य कृती समितीच्या वतीने माढा व माळशिरस तालुक्यातील शिक्षक पुरस्काराने सन्मानित 
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने नेहमीच चांगली कृती करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व सन्मान केला आहे. शिक्षक हे जिवंत शिल्पे घडवण्याचे देशोपयोगी व समाजोपयोगी कार्य वर्षांनुवर्षे करीत आहे त्यामुळे असे विधायक व रचनात्मक कार्य करणाऱ्या शिक्षकांना अधिक काम करण्याची ऊर्जा व प्रोत्साहन मिळावे याकरिता त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम आम्ही मागील अनेक वर्षापासून करीत असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले आहे. 
ते कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने माढा व माळशिरस तालुक्यातील 65 शिक्षकांना जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना रविवारी 8 डिसेंबर रोजी बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ.यू एफ जानराव होते.
प्रास्ताविकात कृती समितीचे समाधान गाडगे यांनी सांगितले की,मागील दहा ते बारा वर्षांपासून हा विधायक व रचनात्मक उपक्रम राबवित आहोत.पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील शेंकडों गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. 
सूत्रसंचालन राजेंद्र आसबे यांनी केले.आभार आगतराव भोसले यांनी मानले.
यावेळी संस्थापक अमोल सुरवसे,शशिकला जगताप, नंदकुमार टोणपे,सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,पूजा सुरवसे,संगीता देवकर,मेघना गुंड,उषा पाटील, महावीर आखाडे,सुधीर गुंड, रामचंद्र काटकर,अपूर्व सावंत,विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,प्राचार्य सागर थोरात,हरिश्चंद्र इंगळे, मुख्याध्यापक मारुती ढगे,शंकर धावारे,गजानन जोकार,बंडू जाधव,शिवाजी नागणे,गजानन लावर हरिश्चंद्र गाडेकर,संतोष पाटील,समाधान दुधाळ,प्रियंका शिंदे,रमेश जाधव,ज्ञानेश्वर मस्के,नरसेश्वर पाटील,विनोद काळे,उल्हास सोनार,राजाराम देवकर,तुकाराम भाकरे,मारुती शिंदे,मेघश्री गुंड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-चौकट - महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने माढा व माळशिरस तालुक्यातील 65 जणांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये दोन्ही तालुक्यातील कृतीशील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, कृतिशील प्राचार्य, कृतिशील मुख्याध्यापक, कृतिशील शिक्षक व शिक्षिका,कृतीशील क्रीडाशिक्षक,कृतीशील ग्रंथपाल, कृतिशील लिपिक यांना पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र,शाल व फेटा देऊन गौरवण्यात आले.


Reactions

Post a Comment

0 Comments