Hot Posts

6/recent/ticker-posts

तर आ. सातपुते हे अभूतपूर्व पराभवाचे मानकरी ठरतील

तर आ. सातपुते हे अभूतपूर्व पराभवाचे मानकरी ठरतील



 
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा, आमदार होण्यासाठी अत्यंत व्याकुळतेने प्रचार दौरे करत असलेले, आमदार राम सातपुते हे अभूतपूर्व पराभवाचे मानकरी ठरतेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 कारण निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असो अथवा विधानसभा लोकसभेच्या असो, विकास कामांच्या मुद्द्यावर प्रकर्षाने लढल्या जातात,जनतेच्या समस्यांवर लढल्या जातात.परंतु आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराचे मुद्दे रुग्ण आणि त्यांना केलेली मदत या विषयावर  जास्त भर दिसत आहे. रुग्णांना मदत केलीच पाहिजे, परंतु केलेल्या मदतीचे राजकारण अथवा निवडणुकीच्या रणांगणात भांडवल होऊ नये असे सर्वसामान्य जनतेला वाटते.
        मोहिते पाटील यांची शक्ती, युक्ती आणि विकास कार्यावर असलेली भक्ती या बळावर,राम सातपुते यांची गेल्या पंचवार्षिकला, आमदारकीची लॉटरी लागली.पुढे आमदारकीची हवा त्यांच्या डोक्यात येताच ते हवेत उडू लागले. तर काही वर्षातच  त्यांनी मोहिते पाटील यांच्याशी असलेली राजकीय नाळही तोडून टाकली. पुढे त्यांनी माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील काही गावात, आपले बस्तान बसवून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मी माळशिरस तालुक्याचां विकासरत्न आहे अश्या बोंब ठोकु लागले. काही गोरगरीब रूग्णांना मदत करणे याला जनतेचा विकास केला म्हणता येईल का? परंतु त्या केलेल्या मदतीचे सातपुते यांनी निवडणुकी मध्ये भांडवल केले.केलेल्या मदतीचे व्हिडिओ वायरल करून मते मिळवण्याचा वेगळाच धंधा मांडला, यामुळे त्या रुग्णांच्या भावना का दुखवणार नाहीत?अशीही चर्चा सुरू आहे.
     सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त,विजय प्रताप युवा मंच व इतर संस्थांच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे राबवत आहेत.त्यांनी लाखो दिव्यांग बांधव यांच्या हता पायात, पुन्हा बळ देत, त्यांना स्वताच्या पायावर उभे करण्याचे महान कार्य केले आहे व करत आहेत.कित्येक रुग्णांच्या डोळ्यांच्या सर्जरी झाल्या, त्यांना नव्याने दुनिया दाखवली.कित्येक गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली व ते अखंडपणे सुरू आहे.परंतु त्यांनी कधीच याचा निवडणुकीत उल्लेख केला नाही.  त्याचे भांडवल केले नाही.धैर्यशील मोहिते पाटील यांचे उत्तुंग कार्य आणि कर्तुत्व कामी आले म्हणूनच ते आज खासदार आहेत.            सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्याचे नंदनवन केले,त्यांनी सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला नवी दिशा दिली होती.राज्याच्या विकासात त्यांचा अनमोल वाटा होता.तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अखंड आयुष्यभर, राज्याच्या विकासात भर घालत राहिले.तसेच सर्वच मोहिते पाटील परिवाराने आहोरात्र जनतेची सेवा केली आहे आणि करत आहेत.परंतु त्यांनी कधीच या सेवेचे राजकारणात भांडवल केले नाही.जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे सहकार महर्षी यांचे ब्रिद वाक्ये होते.
    राजकारणाच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालायची असेल तर त्यासाठी आहोरात्र निस्वार्थी भावनेने समाजसेवा करणे  गरजेचे असते. अखंडपणे,राजकीय आणि सामाजिक कार्यात वहाऊन घेतलेले नेतृत्व म्हणून ठसा उमटवला पाहिजे. विकास कामांच्या दृष्टीने अभ्यासूक वृत्ती असणे गरजेचे आहे. विचारसरणी आणि शुद्ध वाणी याची सांगड घातली पाहिजे.समाजसेवा करत असताना संयम,सहनशीलता ढासळली जाऊ नये याचीही राजकारणात दक्षता घेणे गरजेचे असते, तसेच पराभव पचविण्याची क्षमता ही लागते असे राजकीय विश्लेषण बोलून दाखवत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments