Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रस्थापितांची होईल सुट्टी,सर्वत्र भैय्यांची गॅरंटी! मतदारांवर डॉ.हुलगेश चलवादींच्या 'गॅरंटी'ची भूरळ भैय्यांना बघून लाडक्या बहिणींचे अश्रू अनावर


प्रस्थापितांची होईल सुट्टी,सर्वत्र भैय्यांची गॅरंटी!
मतदारांवर डॉ.हुलगेश चलवादींच्या 'गॅरंटी'ची भूरळ
भैय्यांना बघून लाडक्या बहिणींचे अश्रू अनावर





पुणे,  ( कटूसत्य वृत्त ):-  
प्रस्थापित राजकीय पक्षांकडून उपेक्षित,पीडित,शोषितांकडून सदैव दुर्लक्ष केले जाते. वडगाव शेरी मतदार संघातील विकासकामांना बसलेली खिळ विकासपर्वात बलवण्यासाठी यंदा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 'प्रस्थापितांची होईल सुट्टी, सर्वत्र भैय्यांची गॅरंटी' ही घोषणा त्यामुळे मतदार संघात सर्वत्र दुमदुमत आहे.मतदारांकडून देखील डॉ. चलवादी यांना निवडून आणण्याची गॅरंटी दिली जातेय. कोरोना काळात केलेले कार्य, टॅंकरमुक्त परिसरासाठी असलेली कटिबद्धता आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी असलेली वचनबद्धतेमुळे अनेक भागांमध्ये प्रचार अभियानादरम्यान डॉ.चलवादींना बघून 'लाडक्या बहिणींचे' अश्रू अनावर होत आहे. मतदार संघातील नागरिकांनी भैय्यांना निवडून देण्याचा इरादा पक्का केला असल्याचे चित्र त्यामुळे दिसून येत आहे.

महागाई, पाणीटंचाई, भयमुक्त वातावरणात पिचल्या गेलेल्या वडगाव शेरी मतदार संघातील नागरिकांसाठी डॉ.चलवादींच्या रुपात नेतृत्व बदलाची संधी चालून आली आहे.आतापर्यंत केलेल्या विविध विकास कामांचा गाजावाजा न करता सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले डॉ.चलवादींचे 'वादे' हे केवळ आश्वासन नाही तर विकासाची पायाभरी असल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.अगोदर पासूनच मतदार संघात प्रचारात आघाडीवर असलेले डॉ.चलवादींना सर्वचस्तरातून जनतेचे प्रेम मिळत आहे.मतपेट्यांमधूनही जनता बसपाला कौल देईल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी सोमवारी (ता.१२) व्यक्त केला.

'साधामाणूस' अशी ओळख असलेले डॉ.चलवादी मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधत त्यांना आपल्या १० गॅरंटीची माहिती देत दिवसाची सुरूवात करीत आहेत.प्रत्येक भागातील सामाजिक संस्था, धार्मिक स्थळ, क्रिडा मंडळ , जेष्ठ नागरिक संघाला भेट देवून आपली गॅरंटी पुर्ततेची वचनबद्धता त्यांना पटवून देत आहेत.साधी बोलणी आणि आश्वासनांची पुर्तता करण्याचा डॉ.चलवादींचा 'ट्रॅक रेकॉर्ड' बघता नागरिकांवर त्यांच्या गॅरंटीची विशेष भूरळ पडतेय. पंचशील नगर, आंबेडकर सोसायटी, शांती नगर असो की संपूर्ण पुणे शहरात डॉ.चलवादींच्या गॅंरटीचीच हवा सुरू आहे.प्रचारात व्यस्त असतांना देखील मदतीसाठी आलेल्या फोन ते घेत असून संबंधितांला मदत करीत आहेत, हे विशेष. 

गरिबांना वैद्यकीय मदत असतो वा त्यांचे उपचारावरील बिल कमी करून देणे, कोरोना काळात मोफत अन्नधान्य वितरण असो, टॅंकरमुक्त परिसरासाठी नगरसेवक असतांना डॉ.चलवादींनी उचललेली पावले आणि महिलांच्या डोक्यावरील कळशी आणि पुरूषांच्या सायकल वरील पाण्याची टाकी उतरवण्यात ते यशस्वी ठरले. पंरतु, गेल्या काळात लोकप्रतिनिधींनी पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे परिस्थिती पुन्हा अनियंत्रित झाली आहे.आता ही स्थिती पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी बसपला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले आहे.

घरोघरी जावून मतदारांसोबत संवाद साधण्यावर चलवादींनी भर दिला आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन नेत्या बहन सुश्री मायावती जी येत्या १७ नोव्हेंबर ला येरवडा येथे महासभा घेवून डॉ.चलवादींच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार आहे. बाईक असो अथवा पदयात्रे स्वरूपात डॉ.चलवादींची प्रचार मोहिमा प्रत्येक भागात भेट देत असून त्यामुळे बसपाच्या बाजून सकारात्मक वातावरण निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments