Hot Posts

6/recent/ticker-posts

विकास प्रकल्पांत अडथळे निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न

 विकास प्रकल्पांत अडथळे निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न



 डहाणू येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

मुंबई (कटूसत्य वृत्त):-विकसितसमृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि महायुती सरकार वेगाने पावले उचलत आहे. कोणालाही उध्वस्त करून विकास करणारे आमचे सरकार नाही तर सर्वांना सोबत घेऊन जाणारे आमचे सरकार आहे. विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रत्येक घटकाला सामावून घेत त्यांचे जीवन उंचावण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी 'महायुतीला पुन्हा संधी द्याअसे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. डहाणू येथे महायुती चे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे विनोद मेढा यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाणगुजरातचे आमदार अरविंद पटेलभाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूतपालघरच्या प्रभारी राणी द्विवेदीराष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूररिपाईं चे पालघर अध्यक्ष सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात खोटा प्रचार करून विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करीत असल्याचा आरोपही श्री. फडणवीस यांनी केला.

श्री. फडणवीस म्हणाले कीपालघर जिल्हा निर्मिती नंतर जिल्हा विकासासाठी मी मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारने अनेक योजना आणल्यागतीमान अंमलबाजावणीसाठी पावले उचलली. केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे पालघर जिल्हा हा देशाच्या आणि राज्याच्या विकासाचे इंजिन बनत आहे. हे प्रयत्न करताना प्रत्येक मोठ्या प्रकल्पावेळी विरोधकांनी खोटा प्रचार करून स्थानिकांची दिशाभूल करत त्यात खोडा घातला. पण आम्ही थांबलो नाही सातत्याने विकास कामे करत आहोत. येथील मच्छिमार बांधव असोत की आदिवासी बांधव असोत सर्वांना समृद्ध करण्यासाठी आमचे सरकार अथक काम करत आहे. जलजमीन आणि जंगल चे रक्षण करण्याचा शब्द येथील आदिवासी बांधवांना देतो असे सांगत त्यांचे अधिकार शाबूत राहतील असेही श्री. फडणवीस म्हणाले. मच्छिमार बांधवांचे जीवन उंचावण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नील क्रांती योजना आणलीमासेमारीला शेती आणि उद्योगाचा दर्जा दिलाकर्ज प्रक्रीया सुकर केलीबंदरे ,जेट्टी ,फिशींग हार्बरबाजारपेठ तयार केली.

मुंबईशी पालघरची कनेक्टिव्हिटी वाढत असून नुकतीच पंतप्रधानांनी येथे विमानतळाची आम्ही केलेली मागणी मंजूर करून विमानतळ बनवण्याची घोषणा केली. वाढवण सारखे महाकाय बंदरनजिकच्या काळात येथून जाणारी बुलेट ट्रेन आणि विरार पर्यंत पोहोचणारा कोस्टल रोड या कामांमुळे पालघर विकासाच्या केंद्रस्थानी येणार आहेअसेही श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

केंद्रातील मोदी सरकारने व महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांचा सविस्तर आढावा श्री. फडणवीस यांनी घेतला. आई भवानीच्या चरणी आज मागू जोगवा, लाल बावटा आणू खालीवर नेऊ भगवा’ ...असा नारा देत विराट सभेला संबोधित करताना श्री. फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार श्री. मेढा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन केले.


Reactions

Post a Comment

0 Comments