Hot Posts

6/recent/ticker-posts

महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना राबविणार

 महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर सोयाबीनकापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना राबविणार



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

 

(कटूसत्य वृत्त):-महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे सरकार आहे. महायुती सरकारच्या उद्योगपर्यटनकृषीसमाजकल्याण क्षेत्रातील अनेकविध योजनांमुळे संपूर्ण विदर्भासह उमरेड परिसराचे  चित्र आता पूर्णपणे बदलून जाणार आहे.  सोयाबीनकापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबविण्यासाठी  भाजपा महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्याअसे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी  केले. 

उमरेड (जि. नागपूर) मतदारसंघातील भाजपा - महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचार सभेत श्री. फडणवीस बोलत होते. आमदार कृपाल तुमानेपरिणय फुकेमाजी आमदार राजू पारवेआनंदराव राऊतदिलीप सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. महायुतीला पुन्हा सत्ता दिल्यास विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 25 हजार रु. एवढा बोनस देऊअशी घोषणाही श्री. फडणवीस यांनी या सभेत केली .  
2009 साली सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी जमिनी खरेदी केल्या होत्या. मात्र तत्कालीन सरकारने त्यांना केवळ एक लाख रुपये मोबदला दिला. आपले सरकार आल्यानंतर आपण सारे नियम बाजूला ठेवत त्यांना दोन लाख रुपये मिळवून दिले. विदर्भ प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन पॅकेज दिले. आता पुन्हा सत्तेवर येताच  गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन समाधानकारक पद्धतीने करणारअसे आश्वासनही श्री. फडणवीस यांनी दिले.
या भागात आपण एमआयडीसी सुरू करत आहोत. पण केवळ एमआयडीसी सुरू करूनच आम्ही थांबणार नाही. तर तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्थाही करणार आहोत. या भागातील तारणा तलावकोलासुर टेकडी या प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटनाच्या अत्याधुनिक सोयी देत हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करणार आहोत. केवळ उद्योग आणि पर्यटनच नव्हे तर सिमेंटकाँक्रिटचे रस्ते, पूल अशा पायाभूत सुविधाही निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आपले सरकार आल्यावर 15 लाख रूपये बिनव्याजी कर्ज देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी कृषि पंप वीज बिल माफीमागेल त्याला सौर पंप योजनाकृषी वीज वितरण कंपनीची स्थापना अशा अनेक योजना महायुती सरकारने आणल्या. एक रुपयात पीक विमा योजना आणून 8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. नमो किसान योजने अंतर्गत 12 हजार रूपये दिले. महायुती सरकार सत्तेवर येताच त्यात वाढ करत 15 हजार रुपये दिले जातीलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
­­

Reactions

Post a Comment

0 Comments