पंढरपूर तालुक्यातून पूर्ण ताकद आ. यशवंत माने यांच्या
पाठीशी उभी करणार - प्रशांत परिचारक
कुरुल (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यासह पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये अर्थात मोहोळ विधानसभा मतदारसंघात यशवंत माने यांनी विकास कामाचा प्रचंड झंजावात तयार केलेला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी विकासाचं रोल मॉडेल बनवून मतदार संघात येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये विकास निधीचा अनुशेष त्यांनी भरून काढला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातून भाजपची पूर्ण ताकद आ. यशवंत माने यांच्या पाठीशी उभा करण्याचे आश्वासन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले आहे.
मौजे पुळूज (ता.पंढरपूर) येथे मोहोळ २४७ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. यशवंत माने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील हे होते.
यावेळी बोलताना राजन पाटील म्हणाले की, स्व. बाबुरावअण्णा पाटील व स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी नेहमीच जनतेच्या हिताचे काम केलेले आहे. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवत आमची पिढी राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे आ. यशवंत माने यांच्यासारखा विकासप्रिय आमदार मतदारसंघाला मिळाला आहे. त्यांना आपल्याला पुन्हा विधानसभेत पाठवायचे आहे.
यावेळी भीमा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कल्याण पाटील, दिनकर मोरे, ज्ञानदेव गायकवाड, हरीश गायकवाड, सरपंच विश्वास महाडिक, पवन महाडीक, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, पंडित भोसले, तानाजी पवार, मुबीना मुलाणी, वर्षाराणी शिंदे यांच्यासह पांडुरंग परिवार, भीमा परिवार, विठ्ठल परिवार व चंद्रभागा परिवाराचे व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. भीमा परिवार आ. माने यांच्यासोबत दरम्यान, भीमा परिवाराचे सर्वेसर्वा खासदार धनंजय महाडिक यांनी देखील महाडिक शेड पुळूज येथे कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा साधून महायुतीचे उमेदवार आ. यशवंत माने यांचा प्रचार करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. आ. माने यांच्यासाठी भीमा परिवाराचा कार्यकर्ता तुमच्यापेक्षाही पुढे दोन पावले टाकून मतदारसंघात मते खेचण्यासाठी पुढे राहील असे त्यांनी सांगितले.
0 Comments