Hot Posts

6/recent/ticker-posts

राजराजेश्वरी शिक्षण संकुलात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

 राजराजेश्वरी शिक्षण संकुलात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  विनायक नगर येथील राजराजेश्वरी शिक्षण संकुलात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते.यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते.

प्रथम सरस्वती मातेच्या तसेच श्री वीरतपस्वी व तपोरत्नं यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींचे सत्कार केले. माजी विद्यार्थ्यांनी स्वपरिचय करुन देताना गुरुजनांच्या आशीर्वादाने विविध क्षेत्रात आनंदाने कार्य करीत असल्याचे सांगितले. शंकर हुळ्ळे, विनायक पद्मा, श्याम जाई, भाग्यश्री काढा, वरलक्ष्मी चलमेटी, वंदना तेली या माजी विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव  सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिले.विश्वनाथ तंबाके, मारुती कांबळे, शितल पाटील, संगिता नरगिडे, अनंत सौदागर, शिवाजी रानसर्जे आदी तात्कालीन शिक्षकांनी मनोगतातून माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.गरीब परिस्थितीवर मात करुन आईवडीलांचे व गुरुजनांचे नाव लौकीक केल्याचे सांगितले. मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शब्द सुमनानी कौतुक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले ,माजी विद्यार्थ्यांमुळेच नेताजी शिक्षण संस्थेची व राजराजेश्वरी शाळेची लौकीक वाढला. कामगार मुलांची शाळा म्हणून प्रसिद्ध झालेली शाळा आज दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. यासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.कामगार वसाहतील मुले कष्ट कधीच विसरणार नाहीत. यापुढेही  ही शाळा तुमचीच असणार आहे.शाळेची आठवण स्मरणात ठेवून भविष्यात वाटचाल करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षण संकुलातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.स्नेह भोजनानी कार्यक्रमाची सांगता झाली.
Reactions

Post a Comment

0 Comments