विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांनी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी जाहीर केली
बीड विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांनी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी जाहीर केली
बीड (कटूसत्य वृत्त):-शरद पवार गटाने दोन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केल्यानंतर शनिवारी दुसरी यादी जाहीर केली आहे. बीडमध्ये शरद पवारांचा उमेदवार नेमका कोण असेल? याबाबत तर्क लढवले जात होते.
शेवटी बीड विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्योती मेटे, जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र मस्के यांच्या चर्चा थांबल्या आहेत.
जयंत पाटील यांनी शनिवारी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून २२ नावांची घोषणा केली आहे. पूर्वीचे ४५ आणि शनिवारचे २२ अशी ६७ नावांची यादी जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.
0 Comments