Hot Posts

6/recent/ticker-posts

परांडा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या राहुल मोटे यांना शरद पवारांनी दिली उमेदवारी

 परांडा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या राहुल मोटे यांना शरद पवारांनी दिली उमेदवारी


परांडा (कटूसत्य वृत्त):-प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये परांडा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या राहुल मोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विद्यमान आमदार आणि मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याविरोधात त्यांचा सामना होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावांचा घोषणा करण्यात आली होती. आद जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये अद्यापही काही मतदारसंघातील नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, शरद पवार गटानं या जागेवर दावा केला होता. त्यामुळं ठाकरे गटानं माघार घेतल्याचं बोललं जात आहे. आता परांडा मतदारसंघातून तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे असा सामना होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो देतील तेच काम करणार असल्याची भूमिका रणजित पाटील यांनी मांडली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments