२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- २९ ऑगस्ट १९०५ मध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला व सुर्याच्या प्रकाशाप्रमाणे तेजोमय लखलखता तारा या भारत भुमित जन्माला आला आणि दैवी शक्तीच्या रूपात हॉकीचा शहनशहा निर्माण झाला.मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरी केली जाते.हा दिवस संपूर्ण खेळाडूंसाठी सुवर्ण दिवस आहे. मेजर ध्यानचंद हे कर्तबगार,जिद्दी आणि चीकाटी वृत्तीचे खेळाडू होते. त्यांच्या खेळाकडे संपूर्ण जगाचे लक्ष रहात होते. कारण त्यांच्या खेळण्यात मोठी जादू होती.त्यामुळेच त्यांना हॉकीचे जादुगार म्हणतात.मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत १९२८, १९३२, १९३६अशा प्रकारे तिनं वेळा गोल्डन कामगिरी बजावुन देशाची आन-बाण-शान उंचावण्याचे कार्य केले.यातुन ते संपूर्ण जगात हॉकीचे जादुगार म्हणून प्रसिद्ध झाले.आज आपल्याला देशात राष्ट्रीय खेळांचा जो बोलबाला आणि लौकिकता दिसत आहे. त्याचे संपूर्ण क्षेय मेजर ध्यानचंद यांना जाते आणि यातूनच देशातील खेळाडूंना मानसन्मान मीळत आहे. हॉकी सोबतच कबड्डी, भालाफेक, थाळी फेक, खो-खोसह अशा अनेक मातीतील राष्ट्रीय खेळांना मोठे स्थान मिळविले आहे.यामुळे खेळाडूंचे होसले बुलंद झाल्याचे दिसून येते. देशात खासदार क्रीडा महोत्स किंवा इतर माध्यमातून खेळांना महत्व देऊन खेळाडूंमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली जाते.याच अनुषंगाने अनेक खेळांचे मोठ्या प्रमाणात आयोजन वेगवेगळ्या राज्यांमध्ये केले जाते. राष्ट्रीय खेळांना सकारात्मक भूमिका देण्याचे क्षेय मेजर ध्यानचंद यांच्या प्रयत्नातूनच साकार होत आहे. आपण पहातो की आज देशातील महत्वपूर्ण संपूर्ण राष्ट्रीय खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणवु पोहोचले आहे. त्यामुळे आपण पहातो की आज राष्ट्रीय खेळांचा बोलबाला आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. कबड्डी हा राष्ट्रीय खेळ होता आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचला आहे ही भारतासाठी गौरवास्पद बाब आहे.भारताने राष्ट्रीय खेळांमध्ये अव्वल स्थान मिळवून देशाची आन-बाण-शान उंचावण्याचे कार्य देशाच्या खेळाडूंनी केले.त्यामुळे आपण समजू शकतो की राष्ट्रीय खेळ अत्यंत शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत. भारतीय खेळाडू देशात-विदेशात जावुण राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावुन सुवर्ण पदक, रौप्य पदक व कांस्य पदक प्राप्त करून तिरंग्याची शान उंचावतात.त्यामुळे देशातील तळागाळातील संपूर्ण खेळाडूंना माझा सलाम. कॉमनवेल्थ गेम, ऑलिंपिक खेळ, पॅराऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय खेळ मोठ्या प्रमाणात दिसून येते व राष्ट्रीय खेळांच्या भरोशावर आपण आज जगात आपली छाप सोडली आहे व पकड मजबूत केली आहे.याचाच आनंद देशातील १४० कोटी जनता नेहमी घेत असते.आज खेळांच्या बाबतीत असो वा अन्य बाबतीत संपूर्ण जग भारतासमोर नतमस्तक होतांना दिसते.याचे मुख्य कारण म्हणजे मेजर ध्यानचंद यांच्या सारख्या खेळाडूंनी घालून दिलेली जडणघडण व आपल्या पुर्वजांनी जे मातीतील खेळ आपल्याला शिकवीले त्यातूनच आज संपूर्ण राष्ट्रीय खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणवु पोहोचल्याचे दिसून येते. त्याकाळी जगातील नामांकित व्यक्ती मेजर ध्यानचंद यांची हॉकी खेळण्याची कला पहाण्यासाठी उत्सुक असायचे.कारण लोकांना वाटायचं की त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक आहे की काय असे वाटत होते.१९३५ साली विश्वविख्यात क्रीकेटपटु डॉन ब्रॅडमन मेजर ध्यानचंद यांना भेटले.त्यांनी त्यांच्या हॉकीतील चेंडू वळवीचे सामर्थ्य पाहून कौतुक केले म्हणाले ध्यानचंद जी खरोखरच आपल्या खेळण्यात व खेळात जादू आहे.१९३६ साली बर्लिन येथे जर्मनीचा हुकुमशाह एडॉल्फ हिटलर हा हॉकीचा अंतिम सामना पहात होता.जर्मनी विरूद्ध भारत असा सामना होत असतांना भारताने जर्मनीचा 8 विरूद्ध 1 गोलनी दनदणीत पराभव केला.हा खेळ पाहुण हिटलर आश्चर्य चकित झाले.खेळ संपल्यानंतर हिटलरने मेजर ध्यानचंद यांना भेटीचे निमंत्रण दिले.या भेटीमध्ये हिटलरने मेजर ध्यानचंद यांचे खुप कौतुक केले व त्यांच्या खेळण्याची जादु पाहून जर्मनी सैन्यात मोठे पद देण्याची कबुल केले.परंतु मेजर ध्यानचंद यांचे राष्ट्रप्रेम सर्वोपरी होते.त्यामुळे मेजर ध्यानचंद यांनी हिटलरची ऑफर नाकारली व त्यांनी हिटलरला सांगितले की माझ्यासाठी माझी मातृभुमि महान.१९२८ ते १९६४ हे युग भारतीय हॉकीसाठी सुवर्ण युग मानल्या जाते.कारण या काळात आठ ऑलिंपिकमध्ये सात सुवर्ण पदक मिळाले होते हा भारतासाठी गौरवशाली इतिहास आहे.काही दिवसांपूर्वी महिला कुस्तीपटूंवर मोठा अन्याय झाला होता व न्याय मिळावा यासाठी खेळाडूंना रस्त्यावर यावे लागले ही चिंताजनक आणि गंभीर बाब आहे.त्यामुळे खेळाडुंच्या बाबतीत मी सरकारला विनंती करतो की देशातील कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात ताबडतोब कारवाई व्हायला हवी. कारण प्रत्येक खेळाडू देशाची आन-बाण-शान आहे .त्याचा मान-सन्मान सर्वच स्तरातून व्हायला हवा यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नकोच.तेव्हाच खेळाडूंची मान उंचावेल. देशातील संपूर्ण तळागाळातील खेळाडूंना विनंती करतो की देशातील वाढते तापमान, वाढते प्रदूषण व दिवसेंदिवस कमी होत असलेली ऑक्सिजनची मात्रा पहाता आज वृक्ष लागवड अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे २९ ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण खेळाडूंनी व सरकारनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली पाहिजे असे मला वाटते.कारण आज लावलेले वृक्ष अनंत काळापर्यंत जिवित राहिल व २९ ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवस सर्वांच्याच स्मरणात राहील. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.जय हिंद!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार. (माजी विद्यापीठ प्रतिनिधी,नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर
0 Comments