ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सोलापूर येथे उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वाचनालयातील जेष्ठवाचक विठ्ठल पोळ यांचे शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .त्यानंतर ध्वजवंदन होऊन राष्ट्रगीता नंतर अभिवादन करण्यात आले .सदर कार्यक्रमास वाचनालयाचे खजिनदार तेजुसिंग चव्हाण ,शंकर फकरे, सचिन माने, लवराळे सर ,सौ सारिका माडीकर, प्रभाकर फुलमाळी, अशोक कडदास, शिवकांता वास्ते, हर्ष मोरे ,शुभम कुंभार, वीरेंद्र प्रसाद माडीकर, विशाल बासुतकर यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका मोरे यांनी केले तर आभार सौ सारिका माडीकर यांनी मानले.
0 Comments