भरपावसात वैरागमध्ये रास्तारोको; शाळेला मनोज जरांगे पाटलांचे नाव
वैराग (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सगेसोयरे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी सकाळी १० वाजता भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, बार्शी तालुक्यातील मुंगशी विद्यालयाला मनोज जरांगे- पाटलांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे.
आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दररोज वेगवेगळ्या गावांत आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची गांभीर्याने सरकारने दखल घेऊन लवकरात लवकर मराठा समाजासाठी सगेसोयरे कायदा लागू करण्यात यावा; अन्यथा, येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक तानाजी पवार, मंडळ अधिकारी वीरेश कडगंजी यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी तलाठी महेश जाधव, गोपनीय शाखेचे किसन कोलते आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.
0 Comments