Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रफुल्ल पटेलांच्या मालमत्ता सुटल्या

प्रफुल्ल पटेलांच्या मालमत्ता सुटल्या 



 सोलापूर(कटूसत्य वृत्त); -प्रफुल्ल पटेलांच्या मालमत्ता सुटल्या

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या 180 कोटी रुपयांच्या मालमत्तांची ईडीच्या तावडीतून सुटका करण्यात आली. गँगस्टर इकबाल मिर्चीशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने पटेल यांचे वरळीतील अनेक फ्लॅट्स जप्त केले होते.

ती जप्ती अपिलीय न्यायाधिकरणाने दोन वर्षांनंतर रद्द केली. पेंद्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच पटेल यांच्यावर ईडीचे न्यायाधिकरण 'प्रसन्न' झाले.

वरळी येथील 'सीजय हाऊस' या इमारतीच्या 12 व्या मजल्यापासून 15 व्या मजल्यापर्यंत अनेक फ्लॅट्सची मालकी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे. या मालमत्तांची किंमत 180 कोटी रुपयांहून अधिक आहे. गँगस्टर इकबाल मिर्चीच्या पत्नीशी केलेल्या बेकायदा व्यवहारांतून ही कोटयवधींची मालमत्ता मिळवल्याचा ठपका ठेवत ईडीने 2022 मध्ये संबंधित फ्लॅट्स जप्त केले होते. त्यावेळी प्रफुल्ल पटेल विरोधी पक्षात होते. मात्र दहा महिन्यांपूर्वी अजित पवार गटाने मिंधेंशी हातमिळवणी केली आणि पटेल यांना पेंद्रीय यंत्रणांच्या कृपादृष्टीची अनुभूती आली आहे. दोन महिन्यांपूर्वी एअर इंडिया गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला होता. त्यापाठोपाठ मनी लॉन्ड्रींगची प्रकरणे हाताळणाया अपिलीय न्यायाधिकरणाने पटेल यांच्या मालमत्तांची ईडीच्या तावडीतून सुटका केली आहे.

दोन वर्षांनंतर कारवाई 'बेकायदा'
प्रफुल्ल पटेल, त्यांच्या पत्नी वर्षा आणि त्यांच्या 'मिलेनियम डेव्हलपर्स' पंपनीच्या मालकीचे 'सीजय हाऊस' इमारतीतील सात फ्लॅट्स ईडीने 2022 मध्ये जप्त केले होते. त्या कारवाईवर नंतर 'पीएमएलए'च्या निर्णय प्राधिकरणानेही शिक्कामोर्तब केले होते. दरम्यानच्या काळात पटेल विरोधी पक्षातून सत्तेत मिंधेंसोबत गेले. त्यानंतर आता साफेमा येथील अपिलीय न्यायाधिकरणाने ईडीची कारवाई बेकायदा ठरवली. दोन वर्षांनंतर न्यायाधिकरणाला हा साक्षात्कार झाला.

ईडीने 2 वर्षांपूर्वी केलेले आरोप
– पटेल कुटुंबीयांनी बेकायदा व्यवहारांच्या माध्यमातून गँगस्टर, ड्रग माफिया इकबाल मिर्चीची पत्नी हाजराकडून वरळीतील तब्बल 14 हजार चौरस फुटांची मालमत्ता मिळवली होती.
– मिर्चीची पत्नी हाजरा व तिचे दोन मुलगे आसिफ व जुनैद यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले होते.
– ईडीने मॅट्रिक शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आल्यानंतर पटेल कुटुंबीयांची 20.6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

न्यायाधिकरणाने काढलेले निष्कर्ष
– ईडीने वरळी येथील प्रफुल्ल पटेल व त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांवर केलेली जप्तीची कारवाई बेकायदा आहे.
– 'सीजय हाऊस' इमारतीतील जप्त केलेल्या मालमत्ता मनी लॉन्ड्रींगशी संबंधित नाहीत. तसेच या मालमत्तांचे गँगस्टर इकबाल मिर्चीशी कनेक्शन नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments