Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा मतदार संघात भाजपाचे सिट धोक्यात - बारसकर

 माढा मतदार संघात भाजपाचे सिट धोक्यात - बारसकर

अकलूज(कटूसत्य वृत्त):- वंचित बहुजन समाज पक्षाने मला उमेदवारी दिल्यामुळे माढा मतदार संघात भाजपाचे सिट धोक्यात आले असल्याचे प्रतिपादन रमेश बारसकर यांनी अकलूज येथे केले.बारसकर म्हणाले, मी स्वच्छ चारिञ्याचा उमेदवार आहे. मी कोणी साखर कारखानदार, शिक्षण सम्राट नाही. माझे व्हीजन स्पष्ट आहे. मला निवङुन दिल्यास सर्वप्रथम मी जीएसटी प्रणालीमध्ये बदल करेन. नागरीकांना वीज, शिक्षण मोफत देण्याचा प्रयत्न करेन. सर्व साखर कारखान्यांच्या वजन काट्यावर सरकारी माणसाची नियुक्ती करुन शेतक-यांची लुट थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक मुलींच्या नावावर २५ लाख रुपयांची एफङी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

दुधाला दर, कांद्याला दर व ऊसाला वाढीव दर मिळावा म्हणुन मी यापुर्वी आंदोलने केली आहेत. आमच्या दुध दर आंदोलनामुळेच सरकारने अनुदान जाहीर केले. मला संसदेत निवङुन पाठवल्यास १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस प्रत्येक निवङणुक लढण्याचा अधिकार प्राप्त करुन देवु. माढा लोकसभा मतदार संघामध्ये मराठा, धनगर, ओबीसी, एससी मतदारांची संख्या मोठी आहे. माझ्यामुळे भाजपा आणी राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी होणार असल्याने माझ्या विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचे बारसकर म्हणाले. वंचितचे सर्व स्टार प्रचारक या मतदार संघात प्रचाराच्या तोफा ङागतील त्यावेळी येथिल वातावरण निश्चित बदलेल अशी खाञीही त्यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments