Hot Posts

6/recent/ticker-posts

सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठीच भाजपाच्या किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराची पिपाणी वाजवल्याची दिली कबुली..!

 सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठीच भाजपाच्या किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराची पिपाणी वाजवल्याची दिली कबुली..!

सोलापूर (दादासाहेब नीळ): - सध्याच्या राजकीय दलदलीत दल बदलू पलटूराम का वाढताहेत....गेल्या दहा वर्षात केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ईडी, सीबीआय, आयकर यांच्या भीतीने व खोक्याच्या राजकारणापायी बेडूक उड्या मारल्या. या बेडूक उड्या मारणाऱ्यांसाठी आम्हीच भाग पाडलं अशी स्पष्ट कबुली दस्तुरखुद्द भाजपाचे किरीट सोमय्या यांनी मुंबई तक या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दिली.  

कोण सत्तेच्या लालसेने सत्तालोबी होऊन तर कोण ईडीचा भुंगा मागे लागेल या भीतीने स्वतःच्या स्वार्थापोटी नीतिमत्तेवर पाणी टाकून भाजपा समोर लोटांगण घालत आहे. हे खरं असलं तरी आणि भाजपाने भ्रष्टाचाराविरुद्ध आजवर प्रचंड मोठी शक्ती पणाला लावले असली तरी आजपर्यत कोणत्याही नेत्याचा भ्रष्टाचार त्यांना उघड करता आला नाही. हे मात्र भाजपाचे किरीट सोमय्या यांनी मान्य केलं आहे. 

मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी जेलमध्ये पाठवीन अशी पिपाणी वाजवण्याचं काम मला भाजपने दिल होत ते मी प्रामाणिकपणे केलं आहे हे सांगण्यास सोमय्या विसरले नाहीत. ते फक्त भाजपाने दिलेलं काम इमान इतबारे करत असले तरी  खरी गोम तर इथेच आहे. कारण आजवर सोमय्यांनी फक्त घोटाळे उघड केले परंतु त्यानंतर त्या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष न लावता घोटाळा करणाऱ्यांच्याच गळ्यात गळा घालून हातात कमळ दिलं. आणि हे तडजोडीचं राजकारण असल्याचं खुद्द सोमय यांनी सुद्धा कबूल केलंय.

मुंबई तक वाहिनीवरील एका धाडसी पत्रकाराने किरीट सोमय्यांशी आक्रमकपणे संवाद साधून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नंतर सोमय्यांनी सुद्धा सत्य कबूल करत भाजपा तडजोडीच राजकारण करत असल्याचे मान्य करून भंडाफोड केला आहे. 

याच दरम्यान किरीट सोमय्या म्हणतात की,"जर आम्ही हे ब्लॅकमेलिंगचं राजकारण केलं नसतं तर या महाराष्ट्रावर शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि काँग्रेस या तिघांचं राज्य कायम राहिल असतं. भाजपच्या नेत्यांना तुरुंगात जावं लागलं असतं.आणि महाराष्ट्राचा संपूर्ण विकास थांबला असता.याचाच अर्थ असा निघतो की भाजपामध्ये सुद्धा भ्रष्टाचारी नेते भरपूर आहेत. त्यामुळेच त्यांना तुरुंगाची भीती वाटली की काय असाही प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे ज्या भाजपाची ओळख महाराष्ट्राला शिवसेनेमुळे झाली त्याच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपाने वेगळी चूल मांडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा किरीट सोमय्या म्हणतात की भाजपा शिवसेनेने संपवली असती आजवर ४० वर्षाच्या राजकारणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पासून ते आजपर्यंत जर सर्व लेखाजोखा पाहिला असता प्रत्येक वेळी भाजपानेच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.

तरी सुद्धा हे महाशय शिवसेनेने भाजपाला संपवले असते असे विधान करत आहेत. प्रत्येक वेळी दिशाभूल करून स्वार्थी राजकारण करण्यामध्ये आणि पलटूराम लोकांना जवळ करून राजकारण करणारी पार्टी भाजपा असल्याचे या सोमयांनी मान्य केलेल आहे. हेच सोमय्या पुढे म्हणतात की, शरद पवारांनी भाजपा संपवली असती आणि भाजप नेत्यांना तुरुंगात टाकलं असतं.  परंतु गेल्या 50 वर्षाच्या राजकीय इतिहासात शरद पवारांनी कधीच नीतिमत्ता सोडून राजकारण केलेलं नाही त्यांनी कधीच कोणता पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केला नाही. तरीसुद्धा त्यांना पवारांची भीती का वाटते. उलट पवारांना संपवण्यासाठीच भाजपाने फार मोठे षडयंत्र रचून अजितदादांना जवळ केलंय हे त्यांच्याच नेत्यांनी (चंद्रकांत पाटील) जाहीर सांगितलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर विमान प्राधिकरणचा भ्रष्टाचार झाल्याचे भाजपा बोंब ठोकून सांगत होती परंतु पटेल दादांच्या पावलावर पाऊल टाकून भाजपसोबत आल्यानंतर त्यांनाही क्लीन चिट दिली. 

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील छगन भुजबळांना मागच्या पाच वर्षाखाली तुरुंगात पाठवणाऱ्या भाजपाने आज मात्र लाल दिव्याची गाडी दिली...हे कसलं राजकारण...?कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ भाजपसोबत येण्याअगोदर त्यांच्या घरी सातत्याने जाणारी ईडी...आता नेमकं कुठं थांबली हाही प्रश्न जनतेतून विचारला जातोय. नुसता भ्रष्टाचार झाला म्हणून बोंब मारायची...आणि आपल्या गळाला लागला की भ्रष्टाचार नाही हा शिष्टाचार झाला म्हणून त्याला झोका देत बसायचं. हे आजवरच्या इतिहासात भाजपाचं राजकारण पाहायला मिळालेला आहे. सोमय्यांनी आजवर ज्यांची नावे भ्रष्टाचारांच्या यादीत टाकली. त्यामध्ये एकाही प्रकरणाचा सोक्षमोक्ष दूध का दूध पाणी का पाणी झालेलं नाही. 

निवडणुका जिंकण्यासाठी केवळ भ्रष्टाचार झाल्याचा आव आणणारे सोमया. ही सर्व राजकीय तडजोड असल्याचं जेव्हा माध्यमांसमोर कबूल करतात त्यावेळी खरंच या संपूर्ण राजकारणाची विशेषता भारतीय जनता पार्टीची सर्वसामान्य माणसाला सुद्धा चीड आल्याशिवाय राहणार नाही.. परंतु ज्यांनी काही केलं नाही किंवा ईडीला सुद्धा जे घाबरले नाहीत त्यांना भाजपाने सत्तेचा धाक दाखवून कारण नसताना जेलमध्ये पाठवले त्यामध्ये शिवसेनेचे खा.संजय राऊत यांना पत्राचार तथाकथित घोटाळ्यामध्ये अडकवलं शेवटी हाती काहीच न लागल्यामुळे जामीनावर सोडून दिलं. महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असणारे अनिल देशमुख यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांना दीड वर्ष तुरुंगात पाठवलं आणि शेवटी हाती धुपाटणे मिळाल्यानंतर त्यांना सोडून दिलं अशा प्रकारे भाजपची राजकारण करण्याची अतिशय खालच्या दर्जाची पद्धत असल्याचे संपूर्ण देशातील नागरिकांना ज्ञात झालेले आहे. सातत्याने इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या राजकीय नेत्यांविषयी सर्वसामान्यांच्या मनात असणारा विश्वास  उडत चाललेला आहे.  पक्ष बदलणाऱ्यांना सन्मानाने प्रवेश देऊन लाल दिव्याची गाडी दिली जाते त्याचबरोबर तुम्ही आमच्या सोबत राहा आणि कितीही भ्रष्टाचार करा असेही एका बाजूने सांगितलं जातं की काय असाही प्रश्न उपस्थित होतोय. केवळ सत्ता आणि संपत्तीच्या बळावर राजकीय नेत्यांना कधीही काहीही मिळत असेल तर या देशातील कायदे कानून आणि नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का..?  हा खरा प्रश्न या निमित्ताने पुढे येतोय. 

सध्याच्या देशातील आणि राज्यातील अस्थिर राजकारणास जबाबदार कोण...? 

त्याचबरोबर" स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून" या मनीप्रमाणे सध्याचे राजकारण दिसत आहे. गेल्या दहा वर्षापासून एक ही पत्रकार परिषद न घेणारे प्रधानमंत्री. जन की बात न घेता मन की बात मधून बोलणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या विरोधात बोलणारा या देशात कोणीच नको आहे म्हणूनच ते ईडी आणि इन्कम टॅक्स, सीबीआय या संस्थांना हाताशी धरत आहेत ही वस्तुस्थिती आहे. इलेक्ट्रो बाँड चा (रोखे) घोटाळा  भाजपाने केला असे काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने सांगत असले तरी त्याकडे मात्र ईडीच्या अधिकारी थोडेही लक्ष देत नाहीत.. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या विरोधकांची खासदारकी रद्द करणं म्हणजे लोकशाही आहे का...?  नाही असाही प्रश्न देशातील नागरिकांना पडलेला आहेच. परंतु भाजपाने सोडलेले किरीट सोमयारूपी भुंगे फक्त विरोधी पक्षातील नेत्यांनीच भ्रष्टाचार केला म्हणून सतत पिपाण्या वाजवतात. परंतु भ्रष्टाचार करणाऱ्यांना हेच भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी सन्मानाने जवळ घेतात..याचा अर्थ काय...? भाजपा वॉशिंग मशीन आहे की काय कोणीही भ्रष्टाचार करून भाजपामध्ये या स्वच्छ व्हाल आणि पुन्हा लाल दिव्याच्या गाडीत बसून मतदारसंघात जा...! 

अशा प्रकारचं गलिच्छ आणि नीतिमत्ता सोडलेलं राजकारण सध्या या देशात आणि राज्यात होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments