Hot Posts

6/recent/ticker-posts

महिला दिनाचे अवचित्य साधून महिलांचा "मानपात्र "देऊन गौरव करण्यात आला.

 महिला दिनाचे अवचित्य साधून महिलांचा "मानपात्र "देऊन गौरव करण्यात आला.


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-ग्राहक समिती तर्फे "महिला दिना  "निमित्त प्रत्येक क्षेत्रातील चांगले काम करणाऱ्या महिलांचा सत्कार व "महिला मेळावा "घेण्यात आला.

महिला दिनाचे अवचित्य साधून ग्राहक समिती तर्फे मोहोळ येथे प्रत्येक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा "मानपात्र "देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जयश्री जोशी मॅडम आरोग्य विभाग हे होत्या. शुभांगी पांढरे मॅडम आशा वर्कर ट्रेनर व बाल विकास केंद्राच्या दाढे मॅडम तसेच अनेक महिलांनी मनोगत व्यक्त करून ग्राहक समिती च्या कार्याचे कौतुक केले.

     तानाजीराव गुंड ग्राहक समिती प्रदेश अध्यक्ष, संतोष कोल्हाळ जि. अध्यक्ष, बबनराव नरुटे ता. अध्यक्ष,महादेव जाधव मागासवर्गीय सेल जि. अध्यक्ष,किसन गायकवाड ता. उपाध्यक्ष,मंगल नाईकनवरे महिला प्रदेश उपाध्यक्ष, अंजली मोहिते महिला जि. अध्यक्ष,सारिका गायकवाड संस्कृतीक विभाग अध्यक्ष,हे यावेळी उपस्थित होते.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता पाटील ता. महिला अध्यक्ष, अंजली वस्त्रे शहर महिला अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments