इंदापूर-टेंभुर्णी लोकल बससेवा सुरु करावी मागणी लेखी स्वरूपात मान्य केल्याने उपोषण आंदोलन स्थगित
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- इंदापूर-टेंभुर्णी लोकल बससेवा सुरु करावी व भिमानगर (ता.माढा) येथे लोकल व लांब पल्ल्याच्या बसेसला थांबा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इंदापूर येथे केलेल्या आमरण उपोषण आंदोलनास यश आले आहे.सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याने उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले.पूर्वी सुरू असलेली इंदापूर-टेंभुर्णी लोकल बससेवा अनेक दिवसांपासून बंद झाल्याने व भिमानगर येथे लांब पल्ल्याच्या बसेसना थांबा नसल्याने शालेय विद्यार्थी व महिला,जेष्ठ नागरिक यांची अत्यंत गैरसोय होत होती.यामुळे विद्यार्थी,विद्यार्थीनी यांचे अतोनात होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (राजू शेट्टी) बससेवा सुरू करावी अन्यथा आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा इंदापूर आगारप्रमुख यांना दिलेल्या निवेदनात दिला होता.मात्र बससेवा सुरू झालीच नाही.शेवटी आंदोलनचं करावे लागले.देशभर बेटी पढाव...बेटी बचाव चे नारे दिले जात आहेत.मात्र शासनाचे हे सर्व दावे प्रत्यक्षात किती फसवे आहेत हेच या घटनेने दिसून आले.
०५ फेब्रुवारी रोजी इंदापूर बस स्थानकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी,विद्यार्थिनी व नागरिक यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले.उपोषण आंदोलन सुरू होताच प्रशासनाने गंभीर दखल घेत सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे व उपोषण आंदोलन स्थगित करावे असे आवाहन स्थानक प्रमुख परशुराम भोसले केले.
आमरण उपोषण आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील,ता.अध्यक्ष प्रताप पिसाळ,युवक अध्यक्ष बापू कोकाटे,विष्णू कुंभार,संतोष नाईकनवरे,निलेश मेटे,नाना मेटे,राजेंद्र बनसोडे,राज राजमाने,मोहन कळसाईत,सौरभ गवळी,मच्छिंद्र सलगर,ओंकार आरकिले,वैभव सरडे,रोहित गवळी,विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

0 Comments