छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त थोरला मंगळवेढातालीम
मंडळातर्फे २१ हजार लोकांना शिवभोजन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे अनेक मंडळाची विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे.सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी ऐकिवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाच आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आलं आहे .शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेलबंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालमी वतीने मागील अनेक वर्षापासून सुरु केला आहे . सुरवातीस सात हजार नंतर अकरा हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक आले आहे .मिरवणुक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची बंदोबस्तावेळी होणारी जेवणाची आबाळ लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे .
१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी आण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे सर्व शिव भक्तांनी याचा लाभ घ्यावा या वर्षी ऐकिवीस हजार शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालमीचे आधारस्तंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी केला आहे ,कुशल संघटक संकेत भाऊ पिसे यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार आहे
शिवभोजन कार्यक्रमाचं उदघाटन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवपुजन करून करण्यात येईल या प्रसंगी पोलिस आयुक्त एम.राजकुमार,सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेलीउगले,शिवसेना संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत,अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले,दिलीप भाऊ कोल्हे मनोजभाई शेजवाल यांच्यासह शहरातील मान्यवर तसेच अधिकारी यांच्य उपस्थितेत हा कायर्क्रम संपन्न होणार आहे अशी माहिती अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सागर पिसे,संतोष माळी, अमोल कदम,समीर लोंढे हजर होते

0 Comments