रन फाँर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात आज रन फाँर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही मॅराथॉन शहरातील मध्य वस्ती भागात 3 कि.मी. अंतरात संपन्न झाली. या मॅरेथॉनमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, सिव्हिल हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय, कोषागार कार्यालय, क्षयरोग कार्यालय, महानगरपालिका व शहरातील शासकीय विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अशा 510 जणांनी सहभाग घेतला होता. व सोलापूर शहरात कुष्ठरोग बाबत प्रबोधन कार्यात सहकार्य केले. या मॅरेथॉनचे नियोजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे आयुक्त शितल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यात पुरुष गटात सुमित अविनाश जावीर (प्रथम क्रमांक) देवराज माळप्पा गौडनवरु (द्वितीय क्रमांक) रोहित मारुती व्होराडे ( तृतीय क्रमांक) तर उत्तेजनार्थ सोमनाथ पांडुरंग हरनाळकर तसेच महिला गटात राजश्री यल्लाप्पा नाकाळी ( प्रथम क्रमांक), निकिता निशिकांत बिनगुंडी (द्वितीय क्रमांक), गीतांजली सुखदेव धावणे (तृतीय क्रमांक) व उत्तेजनार्थ धानेश्वरी श्रीशैल हिरापुरे पारितोषिक देण्यात आले.
ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने , मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.मंजिरी कुलकर्णी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी सोनवणे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.अनिरूध्द पिंपळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सरवदे, माहिती अधिकारी रफिक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेश पवार व जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी , जिल्हा अँथलेटिक संघ अध्यक्ष राजु प्याटी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
मॅराथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ .मोहन शेगर, जिल्हा केंद्रीय पथक वैद्यकीय अधिकारी डॉ. उमा झाड, पनाकुप वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा माने यांच्यासह कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0 Comments