माढ्यातील ऐतिहासिक किल्ल्यासाठी 2 कोटी 54 लाख निधी मंजूर. आ.बबनराव शिंदे
किल्ल्याचे संवर्धन आणि पुनर्जीवन होणार
माढा (कटूसत्य वृत्त):-राज्य शासनाच्या पुरातत्व व संग्रहालय विभागाअंतर्गत माढ्यातील रावरंभाराजे निंबाळकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामांसाठी २ कोटी ५४ लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.आ.शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, माढा हे तालुक्याचे ठिकाण असून त्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.राव राजे निंबाळकर राजघराण्याचे वास्तव्य लाभलेले रावरंभा घराण्याच्या जहागिरीचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते.पुर्वी माढा या गावास माढे असे संबोधले जायचे.सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे या कामासाठी निधी उपलब्ध होणेकरीता शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता.आता या किल्ल्याचे संवर्धनासाठी २ कोटी ५४ लाखाचा निधी मंजूर झाला असून या निधी अंतर्गत ऐतिहासिक किल्ल्याची तटबंदी दुरुस्ती,मुख्य दरवाजा,मुख्य दोन्ही बुरुज दुरुस्ती, तटबंदी विटकाम, मुख्य लाकडी दरवाजा,चिरेबंदी करणे,गढी बाहेरील परिसर सुशोभिकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत.या किल्ल्याच्या निधीच्या कामामुळे किल्ल्यास पुनरवैभव लाभणार असून माढा शहाराच्या विकासात आणखीन भर पडण्यास मदत होणार असल्याचे आ शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अखेर आमदार बबनराव शिदेची भुमिका समोर-
माढा येथील न्यायालयाच्या विभाजनाच्या प्रश्नावर बोलताना आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर भुमिका मांडली आहे. माढा न्यायालयाचे विभाजन करू नये या माढावासियांच्या मागणी बरोबर आम्ही असून या विषयावर ज्या ज्या वेळी माढा शहरात आंदोलन झााले. त्यावेळी येथील माझे कार्यकर्ते त्यामध्ये सामील होते.अशी भुमिका आमदार शिंदेनी प्रसिद्ध पत्रकातुन मांडली आहे.
.jpg)
0 Comments