Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. भोजप्पा जाधव निर्मित "रोमँटिक टुकडे" या हिंदी चित्रपटाचे सोलापुरात शानदार पदार्पण...! वास्तव जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट सर्वांनी पहावा...!! डॉ. भोजप्पा जाधव यांचे आवाहन....!!!

 डॉ. भोजप्पा जाधव निर्मित "रोमँटिक टुकडे" या हिंदी चित्रपटाचे सोलापुरात शानदार पदार्पण...! 

वास्तव जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट सर्वांनी पहावा...!! 

डॉ. भोजप्पा जाधव  यांचे आवाहन....!!! 

सोलापूर (कटू सत्य वृत्त): -रोमँटिक तुकडे हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाशी संलग्न असून समाज बदलण्यात आणि सकारात्मक दिशा देण्यात या चित्रपटाने महत्त्वाची भूमिका बजावली असून प्रत्येक चित्रपट काही सकारात्मक संदेश देत असतो ,असेही काही चित्रपट असतात की सिनेमाचा जादुई प्रभाव प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर कसा होतो. 

प्रेक्षकांनी चित्रपटाच्या प्रवाहात वाहून घेतल्यास ते हसतात रडतात आणि नाचतात सुद्धा..! आम्ही निर्माण केलेला हा रोमँटिक तुकडे हा चित्रपट याच विषयावर आधारित असून मुख्य पात्र गुलमोहर असून हा चित्रपट सर्वांनी बघण्यासारखा आहे अशी माहिती निर्माता डॉ.  भोजप्पा  मोतीराम जाधव यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  जाधव पुढे बोलताना म्हणाले की, " या चित्रपटातील मुख्य पात्र गुलमोहर... नायिका बिहार राज्यातील  बेगूसराह या जिल्ह्यातील  एका छोट्या खेड्यातील अल्लड ,सुस्वरूप,  अशिक्षित तरुणी.. याच खेड्यातील मदरसात शिक्षक असलेल्या याकुत तरूण शिक्षकाच्या प्रेमात पडलेली, एके दिवशी गुलमोहर गरोदर आहे ही बाब संपूर्ण गावात पसरते. 

त्यानंतर गावात पंचायतीचे लोक एकत्र जमतात गुलमोहर गरोदर आहे. तिचा कोणाशी संबंध आहे, यावर मोठमोठी खलबत्ते केली जातात. पंचायत समोर तरुण याकूत त्रिमूर्ती आपला कोणताही संबंध असल्याचे पूर्णपणे नाकारतो. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजते. याकूत व त्याचे नातेवाईक काही कट्टरपंथी विचारसरणीच्या लोकांच्या मदतीने गुलमोहरला ठार मारण्याचा प्रयत्नही करतात. परंतु आपला व आपल्या गर्भातील बाळाचे रक्षण करण्यासाठी गुलमोहर गावातून पळून जाण्यात ही यशस्वी होते. 

गुलमोहर एका शहरात असलेला जाते आणि कालांतराने त्या ठिकाणी एका मुलाला जन्म देते. आणि उदरनिर्वाहासाठी एका सिनेमागृहात सफाई कामगार म्हणून कामास सुरुवात करते. सिनेमागृहात काम करत असताना तेथील जादुई परिणामाचा तिच्यावर इतका प्रभाव पडतो की सिनेमांच्या दुनियेतील रमून जाते आणि एका शिक्षित नाही का आपल्या जिद्दीने आणि संकटावर मात करून सुशिक्षित होऊन एक नामांकित अधिकारी बनते. 

अशाप्रकारे सकारात्मक विचार आणि प्रभावामुळे गुलमोहर आपल्या आयुष्यात क्रांती घडवते हे या चित्रपटात दाखवण्यात आल्यामुळे गुलमोहरच्या जीवनात व आयुष्यात पुढे काय घडणार आहे. हे मात्र प्रेक्षकांना चित्रपट सिनेमागृहात आल्यानंतरच कळणार असल्याचे डॉक्टर जाधव यांनी सांगितले. 

या संपूर्ण चित्रपटाची स्त्रीकरण बिहार राज्यातील बेगूसराय या ठिकाणी झाले असून काही शूटिंग मुंबई या ठिकाणी सुद्धा झाले असून चित्रपटाचा मुख्य अभिनेता पंकज बेरी असून निकुंज मलिक,  भक्ती पुंजानी, आमिया अमीन  कश्यप  असे अनेक कलाकार या चित्रपटात असून पूर्वीच्या काळी प्रेम आणि रोमांच अशी अनेक कथानक आपण पाहिले असून यामध्येही हीच कथा अतिशय रोमँटिक पद्धतीने मांडल्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये समाजात काय चालला आहे आणि समंजस समाज हीच युगाची गुणवत्ता आणि श्रेष्ठत्व सिद्ध करू शकते.  त्यामुळे जुन्या गोष्टी आहेत ते पूर्णपणे नाकारू शकत नाहीत. 

जुनं तेच सून आहे असा आमचा विश्वास आहे की समाज व सामान्य माणसांमध्ये सामन्याचे असायला हवे संतुलन राखून चालणे हेच काळाची गरज आहे.  संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आला असल्याचं डॉक्टर  भाेजप्पा जाधव यांनी शेवटी बोलताना सांगितले. 

डॉक्टर  भाेजप्पा जाधव हे व्यवसायाने डॉक्टर असून महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून विविध पदावर त्यांनी काम केले आहे कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कथा लेखक बाबा कदम आणि रणजीत देसाई यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना कथा कादंबऱ्या वाचण्याचे आणि लिहिण्याची आवड निर्माण झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

या पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रकाश दुधनी, एडवोकेट डीडी कवितके, आणि डॉक्टर एस एम करखेडे यांची उपस्थिती होती.

Reactions

Post a Comment

0 Comments