डेंग्यू सदृश्य रुग्णांचे प्रमाण वाढत असताना मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे,नगराध्यक्षा अॅड मिनल साठे यांची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 8, 2023

डेंग्यू सदृश्य रुग्णांचे प्रमाण वाढत असताना मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे,नगराध्यक्षा अॅड मिनल साठे यांची मागणी

 डेंग्यू सदृश्य रुग्णांचे प्रमाण वाढत असताना मुख्याधिकाऱ्यांनी

 मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे,नगराध्यक्षा अॅड मिनल साठे यांची 

 मागणी 


माढा  (कटूसत्य वृत्त):-माढा शहरातील ८८ लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतुन घरकुल मंजुर झाली आहेत.माढ्यात डेंग्यू सदृश्य रुग्णांचे प्रमाण वाढत असताना मुख्याधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहायला हवे अशी मागणी नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे यांनी  पत्रकार परिषदेतुन केली.माढा शहरातील नव्याने ८८ लाभार्थ्यांना घरकुले मंजुर झाली असुन पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी बांधकाम परवाने घेऊन घरकुलाची कामे सुरु करावीत.शहरात सध्या ४५८ लाभार्थ्यांची घरकुलाची कामे सुरु असुन ती अंतिम टप्प्यात आली आहेत.काही लाभार्थ्यांनी पैसे घेऊन देखील घरकुलाची  कामे केलेली नाहीत.अश्या संबंधितावर कारवाई करण्यास नगरपंचायत प्रशासन हालचाली करत नसल्याची खंत देखील नगराध्यक्षा अॅड.साठे यांनी बोलुन दाखवली.माढा शहरात डेंग्यू सदृश्य आजाराचे प्रमाण वाढले असुन खासगी व सरकारी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत.माढा नगरपंचायत मार्फत फवारणी सुरु आहे.मात्र आरोग्य विभागा मार्फत इतर प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जात नसल्याची बाब देखील नगराध्यक्षा साठे यांनी बोलुन दाखवली. पत्रकार परिषदेस काॅग्रेस नेते दादासाहेब साठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,नगरसेवक अजिनाथ माळी,अरुण कदम,नाना साठे,विकास  साठे आदी उपस्थित होते.


मुख्याधिकारी व इतर अधिकारी  देखील राहत नाहीत मुख्यालयाच्या ठिकाणी-शहरात डेंग्यु रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असुन अश्या  गंभीर परिस्थितीत मुख्याधिकारी पुजा दुधनाळे यांचेसह नगरपंचायत मधील एक ही अधिकारी  मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत.प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यास मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे.मात्र याचे पालन होत नसल्याचा मुद्दा अॅड.मिनल साठे यांनी आधोरेखीत केला आहे.त्यामुळे  आता तरी मुख्याधिकारी व  इतर अधिकारी मुख्यालय ठिकाणी राहतील का ? असा  प्रश्न  या निमित्ताने उपस्थित झालाय.


या संदर्भात मुख्याधिकारी पुजा दुधनाळे यांची बाजु ऐकुन  घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages