स्वच्छता ही सेवा असून श्रमदान एक मानसिक समाधानाचे कारण - चंद्रशेखर मंत्री
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वच्छता ही एक सेवा असून श्रमदान केल्याने एक मानसिक आणि शारीरिक समाधान मिळते असे मत सोलापूर बँक ऑफ इंडिया चे रिजनल ऑफिसर चंद्रशेखर मंत्री यांनी व्यक्त केले.
सोलापूर शहरातील एम्प्लॉयमेंट चौकात असलेल्या सह्याद्री शॉपिंग सेंटर परिसरातील भागात श्रमदान हा कार्यक्रम बँक ऑफ इंडिया ने आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उप व्यवस्थापक अरूण प्रकाश, सहाय्यक महाप्रबंधक सत्यनारायण प्रसाद मुख्य प्रबंधक विजय सोनकुसरे आदी उपस्थित होते.
सुट्टीचे आवश्यकता साधून हे परिसर स्वच्छता करण्यात आले या अधिकाऱ्यांकडे पाहून आणखी कर्मचाऱ्यांनी प्रेरणा घेतली आणि ते सगळे स्वच्छता अभियानात सहभागी झाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य प्रबंधक चेतन टाकले अजित देशमुख निधी शर्मा अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत नाशिककर अर्जुन कोणता सिद्धेश्वर कद्रे यांनी प्रयत्न केले.

0 Comments