२०२४ ला मोहोळचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार ३० हजारांहून अधिक
मताधिक्यांनी विजयी होणार- बाळराजे पाटील
माढा (कटूसत्य वृत्त):- २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मोहोळ मतदार संघाचा आमदार हा राष्ट्रवादीचाच होणार असुन ३० हजारांहून अधिक मताधिक्यांनी विजयी होणार असल्याचा ठोस विश्वास सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते बाळराजे राजन पाटील यांनी व्यक्त केला.
माढ्यात रिस्क गणेश उत्सव मंडळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळराजे पाटील हे आले होते.कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.राष्ट्रवादीच्या अजितदादा पवारांचे व माजी आमदार राजन पाटील यांचा समर्थकच येत्या निवडणुकीत देखील मोहोळ चा आमदार झालेला दिसेल.३० हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन राष्ट्रवादीची सत्ता कायम अबाधित राहील असे ठामपणे सांगितले.गत निवडणुकीत एकास एक लढत असताना देखील जवळपास ४४.५० टक्के इतके मतदान राष्ट्रवादीच्या यशवंत माने यांना मिळाले होते.मोहोळ तालुक्यातील जनता प्रामाणिक काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहत आली आहे. नुकतेच तुरूंगातून बाहेर आलेले मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे ठरवलेले नसुन ते कोणत्या पक्षात जातील ?अजित पवार गटात येतील का ? या प्रश्नावर बाळराजे पाटील यांना छेडले असता रमेश कदम यांनी कोणत्या पक्षात जायचे हे तेच ठरवतील.अजित पवार गटात ते येतील असं वाटत नाही.असे सांगुन मोहोळ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचा अर्थात अजित पवारांच्या गटाच्या उमेदवाराचा जलवा येत्या निवडणुकीत देखील नक्कीच दिसेल.सध्याचे आमदार यशवंत माने यांच्या ग्राऊंड लेवलच्या कामाचे तोंडभरुन कौतुक करुन बाळराजे पाटील यांनी एकप्रकारे यशवंत माने यांच्या येत्या निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात अप्रत्यक्ष रीत्या सकारात्मकता दर्शवली आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत अजित पवार गटाचे यशवंत माने हे उमेदवार असतील का ?
याबाबत तर्क लढवले जाऊ लागले आहेत.अनगर ला दुय्यम निबंधक कार्यालय मंजुर झाल्याने खरेदी विक्री चे व्यवहार करायला अनगर ला यावे लागणार असल्यामुळे काहींना आता जड वाटु लागले आहे.लोक कल्याणकारी निर्णय यापुढील काळात देखील घेतलेच जातील असे बाळराजेे पाटील यांनी ठणकावून सागितले.

0 Comments