खा.शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळमध्ये राज्यस्तरीय भव्य खो खो स्पर्धेचे आयोजन - आ.यशवंत माने
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादीचे संस्थापक खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहोळ येथे दि.१२ डिसेंबर पासून राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे भव्य आयोजन केले असल्याची माहिती आ.यशवंत माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदरच्या स्पर्धा नागनाथ ज्युनिअर कॉलेजच्या भव्य पटांगणात भरावीण्यात आल्या असुन या स्पर्धा दिवस रात्र होनार आहेत याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. क्रिडा प्रेमी साठी गॅलरीची व्यवस्था करण्यात अली आहे. सदर स्पर्धेमध्ये उस्मानाबाद, पुणे, नवी मुंबई, वाडी कुरोली, सातारा, नाशिक, रत्नागिरी, रांजणी (पुणे), कुपवाड (सांगली), अहमदनगर, ठाणे, सोलापूर, सांगली, मंगळवेढा आदी राज्यस्तवर खेळलेले संघ या स्पर्धेसाठी बोलविले आहेत. या स्पर्धेचे उद्धघाटन माजी क्रीडा मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ५१००० हजार रुपयांचे पारितोषिक चषक व सन्मान पत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत वैयक्तिक खेळाडूना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.
देशाचे नेते खा. शरचंद्र पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर अम्युचर खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने व न्यु स्पोर्टस् अकॅडमी संचलित राज्यस्तरीय पुरुष/महिला स्पर्धेचे उद्घाटन दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी नागनाथ विद्यालय जुनियर कॉलेज मोहोळ येथे सायं.५ वा. मा.आ आदितीताई सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.तर दि.१४ डिसेंबर २०२२ रोजी स्पर्धेस सदिच्छा भेट देण्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा आमदार रोहितदादा पवार उपस्थित तर प्रमुख उपस्थिती बळीराम काका साठे, माजी आ.राजन पाटील, माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, डॉ .प्रा.चंद्रजीत जाधव, अँड.गोविंद शर्मा, खो-खो असोसिएशन अध्यक्ष महेश गादेकर, लोकनेते शुगरचे चेअरमन विक्रांत पाटील, स्पर्धा निरीक्षक संदिप तावडे महाराष्ट्र खोखो असो यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तरी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींनी स्पर्धा सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी केले.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, शहराध्यक्ष कुंदन धोत्रे, अनंत नागेणकेरी, राजू सुतार, माजी नगरसेवक दत्ता खवळे व शकील शेख आदी उपस्थित होते.
0 Comments