सांगोला शहरात खाजगी क्लासेसचा गोरख धंदा तेजीत.
उघडपणे शिक्षण विभागाची फसवणूक करणाऱ्या खाजगी क्लासेसच्या दरोडेखोरांवर कारवाई कधी होणार?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सांगोला शहरात खाजगी क्लासेसवाल्यांनी जोमात गोरखधंदा सुरू ठेवला आहे.विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे सोंग घेवून विद्यार्थी आणि पालकांची दिवसाढवळ्या लूट करणाऱ्या या खाजगी क्लासेसची दादागिरी बंद करून आर्थिक लुटीतून पालक आणि विद्यार्थी यांची सुटका करण्याची मागणी सुज्ञ पालक आणि शिक्षण प्रेमी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. स्वतःला अति ज्ञानी समजणाऱ्या या खाजगी क्लासेसवर कारवाई करण्याची हिंमत शिक्षण विभाग दाखवेल का? हे पाहणे गरजेचे आहे.
सांगोला शहर आणि तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचा विचार करता,येथील शिक्षणाची गुणवत्ता वाखाण्याजोगी आहे. दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा कल शिक्षण संस्थेतील शिक्षक प्रामाणिक करीत आहेत.पण खाजगी क्लासेसवाले मात्र स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेण्यासाठी पालकांना विविध आमिषे दाखवून जाळ्यात ओढले जात आहे. शिक्षण संस्थेतील शिक्षणा पेक्षा आमच्याकडून दिले जाणारे शिक्षण दर्जेदार कसे आहे.हे विविध माध्यमातून पटवून देत आहेत.पण शिक्षण विभाग माञ यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नसल्याने खाजगी क्लासेसवाले अवाच्या सव्वा फी घेवून पालकांची लूट करीत आहेत.
हे खाजगी क्लासेसवाले चार पत्र्याच्या शेडमध्ये इयत्ता सातवी ते 12 वी पर्यंतचे इंग्रजी,maths, सायन्स, बायोलोजी, केमिस्ट्री आदि विषयासाठी हजारो रुपये फी आकारात आहेत.पण दर्जेदार शिक्षण अथवा सुविधा दिल्या जात नसल्याने पालक वर्गातून खाजगी क्लासेस वाल्याच्या विरोधात नाराजीचा सूर आहे. एखाद्या पालकांनी फी कमी करण्याची मागणी केली तर त्याला अपमानित केले जाते. त्यामुळे या खाजगी क्लासेसवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
तसे पाहता विद्यार्थ्याचा विकास हा शाळेच्या वातावरणात होत असतो.महागडी फी भरून विद्यार्थ्यांनी खाजगी क्लासेसला न जाता आपल्या कॉलेजमधील शिक्षकाच्या लेक्चरला उपस्थित रहावे,अशी माहिती एका पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दै.कटूसत्य च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
Chaukr-- गाजावाजा करून सुरू केलेल्या या खाजगी क्लासेस वर शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानी धाडी टाकून तपासणी करावी, अक्षरशः विदयार्थी आणि पालकांची दिवसाढवळ्या लूट करणाऱ्या खाजगी क्लासेस वाल्याचे हे गोरखधंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
अवाच्या सव्वा फी आकारून मूलभूत सुविधा माञ या खाजगी क्लासेसकडून विद्यार्थ्यांना दिल्या जात नाहीत. मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड मारून तिथेच विद्यार्थ्यांना गोळा करून क्लास उरकला जात असल्याची माहिती एका पालकांनी दिली. सांगोला शहरात सध्या चार ते पाच खाजगी कलासेस सुरू आहेत. सुरू असलेले खाजगी क्लासेस बंद करण्यासाठी दैनिक कटूसत्य च्या पाठीशी उभे राहण्याची हमी अनेक पालकानी दिली आहे.
0 Comments