Hot Posts

6/recent/ticker-posts

छगन भुडबळ यांचा एक मँसेज ; सभागृहात पिकला हशा

छगन भुडबळ यांचा एक मँसेज ; सभागृहात पिकला हशा

                  मुंबई, (नासिकेत पानसरे): विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करत होते.

                  काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी उठले असता, तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मला एक मेसेज आला असल्याचं सांगितले आणि तो मेसेज त्यांनी सभागृहात वाचून दाखवला. 

                  छगन भुजबळांच्या या मेसेज नंतर सभागृहात एकच हसा पिकला. विश्वनाथजी आनंद यांनी सगळ्यां दिग्गजांना बुद्धिबळात हरवलं आहे. त्यामुळे ते मोठे खेळाडू आहेत. मात्र त्यांना जेव्हा विचारलं की, तुम्ही बुद्धिबळाचा डाव खेळाल का?, तर आनंद विश्वनाथजी म्हणाले की, मी आता खेळू शकत नाही. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकच डाव टाकतात की त्यानंतर कोणत्या सोंगट्या कुठे जातात हेच कळत नाही, म्हणून मी काही खेळू शकत नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी भाजपाला टोला लगावला.त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

Reactions

Post a Comment

0 Comments