Hot Posts

6/recent/ticker-posts

वाघोली परिसर व पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या अनधिकृत होर्डिंग,बॅनरवर कारवाई होणार का?

वाघोली परिसर व पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या अनधिकृत होर्डिंग,बॅनरवर कारवाई होणार का?

               लोणी काळभोर(कटुसत्य वृत्त): पुणे महापालिका हद्दीतील होर्डिंग,बॅनर वर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत असून कुठे कारवाई करावयाची राहून गेली असल्यास पुणे शहर पोलिसांच्या ११२ या नियंत्रण कक्षास फोन करून संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नागरिकांना केले आहे.

               पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे कि,संपूर्ण पुणे शहरासह नुकतेच महापालिका सामवेश झालेल्या शहरात लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग,बॅनर ची मोजणी करण्यात आली असून त्यामध्ये १४०० अनधिकृत होर्डिंग,बॅनर मिळून आलेले आहेत.या सर्व अनधिकृत होर्डिंग,बॅनर वर पुणे महानगरपालिकेच्या मदतीने कारवाई करण्यात येत आहे.सदर कारवाई मध्ये काही अनधिकृत होर्डिंग,बॅनर वर कारवाई करावयाची राहून गेली असल्यास नागरिकांनी पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांक ११२ वर संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त गुप्ता यांनी केले आहे.

               वाघोली येथे पुणे-नगर महामार्गालगत तसेच वाघोली-केसनंद रस्ता,वाघोली गावठाण अंतर्गत आदी रस्ते या रस्त्यांच्या दुतर्फा बाजुंनी अधिक प्रमाणात शासनाच्या विविध परवाने,परवानग्या न घेता शासनाचे नियम डावलून अनेक वर्षांपासून अनधिकृत होर्डिंग,बॅनर आहेत.त्यामध्ये काही होर्डिंग, बॅनर चे लोखंड जुने होऊन गंजले आहेत त्यामुळे असे होर्डिंग धोकादायक अवस्थेत अद्यापही उभे आहेत.त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.त्यामुळे वाघोली परिसर व पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या सर्वच होर्डिंगची एकदा संबंधित नियंत्रण कक्षाने पाहणी व चौकशी करून अनधिकृत होर्डिंग,बॅनरवरवर त्वरित कारवाई व्हावी.अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून नागरिक करीत आहे.त्यामुळे आता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नागरिकांना केलेल्या आवाहना नुसार नागरिक याबाबत तक्रार करणार का? व त्यापुढे त्वरित कारवाई होणार का? असा प्रश्न अनधिकृत होर्डिंग,बॅनरवर बाबत उपस्थित झाला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments