Hot Posts

6/recent/ticker-posts

ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या शहरातील १२० नागरिकांना आर्थिक दंड

ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या शहरातील १२० नागरिकांना आर्थिक दंड

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलग न करता घंटागाडीत देणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई मंगळवारी सुरू केली. पहिल्याच दिवशी १२० नागरिकांना एकूण २६ हजार २०० रुपये दंड केला. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठीच ही मोहीम हाती घेतली.

               महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये कचरा देताना ओला व सुका कचरा विलग करून देण्याचे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. कचऱ्याचे विलगीकरण न करता कचरा दिल्यास दंडात्मक कारवाई करू, असा इशाराही आयुक्तांनी दिला होता. पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी मंगळवारी वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या १२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

Reactions

Post a Comment

0 Comments