Hot Posts

6/recent/ticker-posts

पालखी मार्गातील अपघाती वळणे काढा:पोखरापुरात जागर आंदोलन सुरू

 पालखी मार्गातील अपघाती वळणे काढा:पोखरापुरात जागर आंदोलन सुरू

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर मोहोळ पालखी महामार्गातील पोखरापुर गाव, व शाळेजवळची सहा आपघाती वळणे दूर करून मनुष्यहानी टाळा आणि प्राचीन जगदंबा देवीचे मंदीर मूळ ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी पोखरापुर येथील श्री जगदंबा देवी मंदिरात जागर घंटानाद बेमुदत आंदोलन ज्येष्ठ नागरिक धोंडीबा दादा उन्हाळे यांनी सुरू केले आहे.मोहोळ पंढरपूर पालखी महामार्ग क्रमांक ९६५ च्या विकसनाचे काम करताना पोखरापुर गाव व शाळेजवळ ची सात अपघाती वळणे त्वरित दूर करावी व प्राचीन जगदंबा देवीचे मंदिर मूळ ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात यावे या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा दादा उन्हाळे यांनी जगदंबा देवीच्या मंदिरात घंटानाद जागर आंदोलन सुरू केले आहे. मोहोळ पंढरपूर पालखी मार्ग सुरू झाल्यापासून विविध अपघातांमध्ये सुमारे 55 नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे व अनेक जण जखमी झालेले आहेत याची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी पोखरापूर गावानजीक अपघाती सलग सात वळणे त्वरित दूर करावी या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने जगदंबा देवीच्या मंदिरात घंटानाद आंदोलन चालू केले आहे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उपसरपंच आशिष आगलावे यांनी सदरची बाब मान्य जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळवून अपघाती वळण दूर करण्याची व प्राचीन जगदंबा देवीचे मंदिर जतन करण्याची मागणी केली आहे श्री जगदंबा उर्फ अंबिका मंदिर हे सन 1935 पूर्वीपासून पोखरापूर याठिकाणी स्थापित आहे याबाबत संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबई यांना देण्यात आली राज्य पुरातत्व विभागाचे संचालक  डॉ. तेजस मदन गर्गे यांनी याबाबत त्वरित दखल घेऊन प्राचीन श्री जगदंबा उर्फ अंबिका देवी मंदिराचे जतन करणेबाबत प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना कळविले आहे. तरीही या बाबीकडे दुर्लक्ष करीत प्रकल्प संचालक कार्यालय व संबंधित ठेकेदार या भागात शीघ्र गतीने काम करीत आहेत त्यामुळे जगदंबा देवीचे प्राचीन मंदिर त्यांचेकडून पाडण्याची भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे . मंदिराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये म्हणून जगदंबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त धोंडीबा दादा उन्हाळे यांनी वारंवार पत्रव्यवहार करून मंदिर जतन करण्याबाबत विनंती अर्ज केलेले आहेत. तसेच पोखरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने जगदंबा देवी मंदिराच्या एका बाजूने राष्ट्रीय महामार्गाचे काम करावे अशा प्रकारचा ठराव संमत करण्यात आलेला आहे.  तीर्थ क्षेत्र विकासासाठी या महामार्गाची निर्मिती होत असताना दरम्यानच्या मार्गात  येणाऱ्या अन्य तीर्थक्षेत्र व प्राचीन मंदिर जमीनदोस्त करण्याचा अजब कारभार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे . या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जगदंबा मंदिरामध्ये जागर घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता यावेळी पोखरापूर चे ज्येष्ठ नागरिक धोंडीबा दादा उन्हाळे, उपसरपंच आशिष आगलावे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल कदम, दगडू बाबर,  बाळासाहेब काळे, श्रीधर उन्हाळे, बालाजी उन्हाळे, दत्ता खंदारे ,बजरंग लेंगरे सुनील आगलावे, सुभाष दळवे, बाळासाहेब वाघमारे, बाळासाहेब खंदारे, लक्ष्मण वाघमोडे पुजारी,राहुल गुरव बाबुराव खंदारे,दादाराव खंदारे सचिन दळवे,अशोक ‌मोरे, दत्तात्रय कणसे,चिमाताई आष्टूळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments