विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्याबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार:- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 4, 2022

विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्याबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार:- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्याबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार:- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, (नासिकेत पानसरे): विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास सरळसेवा भरतीत देण्यात आलेले दोन टक्के आरक्षण कायम रहावे  तसेच विशेष मागास प्रवर्गातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने शासन सर्वोतोपरी या घटकाच्या पाठीशी आहे अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            मंत्रालयालतील परिषद सभागृह येथे महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्गातील विविध मागण्याबाबत आयोजित बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे  वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद माळी, उपसचिव सिध्दार्थ झाल्टे,  उपसचिव कैलास साळुंखे,महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग महासंघाचे  अशोक इंदापुरे,सैवे रामुलू, रविंद्र कमटम,राजू गाजेंगी, विष्णू कुटे,विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे बालाजी चिनके यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

               मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, विशेष मागास प्रवर्गात सरळसेवा भरतीत देण्यात आलेले आरक्षण          टिकावे यासाठी शासनाकडून मा.उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल.तसेच अनुसूचीत जाती जमाती विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणीक सवलती  विशेष प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू  करणे,शुल्क सवलती,क्रिमीलेअरची अट लागू न करण्याबाबत,जात दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभरित्या देणे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णयान्वये देण्यात येणा-या सुविधा सर्व विद्याशाखेत अभ्यासक्रमासाठी लागू करणे,स्वतंत्र आर्थिक विकास  महामंडळ स्थापन करणे, हातमाग कारागीरांना आधुनिक हातमाग उपलब्ध करून देणे,यंत्रमाग व्यवसायासाठी सवलती देणे जातनिहाय जनगणना करणे याबाबतीत शासन सर्वोतोपरी कार्यवाही करेल अशी ग्वाही  मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिले.

भातु कोल्हाटी समाजाच्या विकासासाठी १० कोटी रूपयांची तरतूद करणार

         मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले,भातू कोल्हाटी  समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख रुपये कर्जाची मर्यादा वाढवून दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जाची योजना आणणार असून या समाजातील गरजू कलांवताना शासनाकडून सुलभरित्या कर्ज मिळावे व त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी १० कोटी रूपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही मंत्रायातील परिषद सभागृह येथे भातू कोल्हाटी अखील महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंतांच्या बैठकीत दिली. 

         यावेळी अखील महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत संघटनेचे अरुण मुसळे यावेळी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages